मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पदार्थांनंतर आता अभिनयाने मन जिंकणार 'Madhura's Recipe'ची मधुरा; 'या' लोकप्रिय मालिकेत झळकणार

पदार्थांनंतर आता अभिनयाने मन जिंकणार 'Madhura's Recipe'ची मधुरा; 'या' लोकप्रिय मालिकेत झळकणार

Madhiras Recipe

Madhiras Recipe

मधुराचा 'Madhura's Recipe' म्हणून युट्युब चॅनल आहे. हा चॅनेल अतिशय लोकप्रिय असून अनेकजण मधुराच्या सोप्या आणि चविष्ठ रेसिंपींना फॉलो करतात. अशातच गृहिणींची लोकप्रिय मधुरा लवकरच आपल्याला मालिकेत दिसणार आहे.

  मुंबई, 15 ऑगस्ट : खमंग, रुचकर, स्वादिष्ठ पदार्थ आणि नवनवीन रेसिपींसाठी मार्गदर्शन करणारी युट्युबर म्हणजेच मधुरा बाचल(Madhura Bachal). मधुराचा 'Madhura's Recipe' म्हणून युट्युब चॅनल आहे. हा चॅनेल अतिशय लोकप्रिय असून अनेकजण मधुराच्या सोप्या आणि चविष्ठ रेसिंपींना फॉलो करतात. अशातच गृहिणींची लोकप्रिय मधुरा लवकरच आपल्याला मालिकेत दिसणार आहे. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असून तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मधुरा बाचल लवकरच आपल्याला मराठी मालिकेत झळकताना दिसणार आहे. मधुरा झळकणार असलेल्या लोकप्रिय मालिकेचं नाव 'सुख म्हणजे काय असतं' आहे. स्टार प्रवाह वरील 'सुख म्हणजे काय असतं' मालिका सतत चर्चेत असते. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं असून ही मालिका चांगलीच गाजत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्ट आणि टर्नमुळे मालिका चर्चेचा विषय ठरत असते. अशातच मालिकेत आणखी एक नवं वळण येणार असल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा -  Hardeek Joshi Akshaya Deodhar: राणादा पाठक बाईंची लगीनघाई लवकरच; केळवणाला झाली सुरुवात 'सुख म्हणजे काय असतं' या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिकेची उत्सुकता आणखीनच वाढणार असल्याचं पहायला मिळतंय. भेटीला येणारा नवी चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून सगळ्यांची आवडती मधुरा बाचल असणार आहे. काही चाहत्यांनी कमेंट करत मधुरा कोणत्या भूमिकेत दिसू शकते हे गेस केलं आहे. अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे की, 'सुगरण नं. 1 कॉप्मिटेशनच्या जज असतील, शेफची भुमिका करणार असेल'. मधुरा मालिकेत नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप समोर आलं नाही.
  दरम्यान, मधुरा बाचल या आधीही छोट्या पडद्यावर झळकली आहे. झी मराठीवर  प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या मस्त मजेदार किचन कल्लाकार या कार्यक्रमातून मधुरा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. यावेळीही तिच्या चाहत्यांनी तिला भरभरुन प्रेम दिलं. आता 'सुख म्हणजे काय असतं' या मालिकेतील भूमिकेला किती प्रेम देणार आणि मधुराची नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या