मुंबई, 6 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Bollywood actress Richa Chadda) सतत तिच्या पडद्यावरच्या ताकदीच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या भूमिकांमुळेही चर्चेत असते. कमी काळातच तिनं स्वतःचा आगळा ठसा सिनेइंडस्ट्रीत उमटवला आहे. आता रिचाच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. अजून एका स्त्रीशक्तीचं वास्तव दर्शन घडवणाऱ्या सिनेमात महत्त्वाच्या रोलमध्ये (role) दिसणार आहे. सिनेमाचं नाव आहे 'मॅडम चीफ मिनिस्टर' (Madam chief minister).
सुभाष कपूर (Subhash Kapoor) यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. कपूर जॉली एलएलबी या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. कपूर यांनी 1990 साले एडिलीतून राजकीय पत्रकाराच्या रूपात आपलं करियर सुरू केलं होतं. त्यांनी त्याकाळात उत्तर भारत कव्हर केला. हा अनुभव या सिनेमाच्या दिग्दर्शनात त्यांना कमी आल्याचं दिसतं आहे.
मॅडम मुख्यमंत्रीमधले खणखणीत डायलॉग आणि वेगळा गेटअप यामुळे रिचाच्या या सिनेमाविषयी उत्सुकता असेल.
सिनेमाचं ट्रेलर (trailer) जरी सिनेमाचा वास्तवाशी कसलाही संबंध नसल्याच्या सूचनेनं सुरू होत असलं तरी या सिनेमाची मुख्य व्यक्तिरेखा उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याभोवती गुंफलेली असल्याचं जाणवत असल्याची चर्चा आहे. या सिनेमाचं शूटिंग लखनऊमध्ये झालं. पुरुषसत्ताक सत्तासंबंधांनी घट्ट वेढलेल्या वातावरणात एक स्त्री संघर्षातून वर येत सत्तेची गणितं कशी बदलते याचा वेध हा सिनेमा घेतो. इतके गुंतागुंतीचे पदर असलेली व्यक्तिरेखा करायला मिळाल्याचा खूप आनंद असल्याची भावना रिचानं ट्रेलर लॉंचच्या वेळी व्यक्त केली.
आज सकाळीच सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित झालं आहे. रिचा चढ्ढानं यात अगदी तळातून सुरवात करत राजकीय प्रगतीची शिडी चढणारी व्यक्तिरेखा साकारली आहे. या व्यक्तिरेखेसाठी शारीरिक आणि मानसिक पातळीवरही बरीच मेहनत तिनं घेतली आहे. यात रिचाशिवाय मानव कौल, अक्षय ओबेरॉय, सौरभ शुक्ला यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Richa chadda, Trailer