मुंबई, 17 जुलै : आपल्या अभिनयानं आणि आवाजानं प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री आणि गायिका म्हणजेच आर्या आंबेकर (Aarya Ambekar). गोड गळा आणि तितकेच सोज्वळ सौंदर्य यांमुळे आर्या अनेकांना भुरळ घालते. अनेक दिवसांपासून आर्या कायम चर्चेत आहे. ती तिच्या नव्या गाण्यांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच आर्यानं इन्स्टाग्रामवर एक नवी पोस्ट केली असून या पोस्टमुळे पुन्हा एकदा आर्या चर्चेचा विषय ठरत आहे. आर्यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिनं अनेक छोटे व्हिडीओ एकत्र करत हा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, तिनं पावसाचा एक छोटासा व्हिडीओ टाकला आहे. त्यानंतर पहिल्या व्हिडीओमध्ये तीनं छत्रीसोबत व्हिडीओ टाकत त्यावर लिहिलं आहे की, मी नेहमीच पावसात बाहेर येत असते कारण छत्रीसोबत क्युट बुमरॅंग काढायचे असतात. दुसऱ्या व्हिडीओमध्ये भजी आणि चहाचा फोटो शेअर करत तिनं लिहिलं की, मग मी घरी आले भजी, पकोडा ऑर्डर करायला. तिसऱ्या व्हिडीओमध्ये चहाचा फोटो शेअर म्हटलं की, त्यानंतर मी आल्याचा चहा बनवला कारण चहा हे सुख आहे. त्यानंतरच्या व्हिडीओमध्ये म्हणतेच भजीसोबत फोटो काढायला विसरु नका.त्यानंतर आर्या म्हणतेय मागे बघून निर्लज्जपणे कॅलरीजवर हसा. हेही वाचा - Adah Sharma: बॉलिवूड अभिनेत्रीची झाली अशी अवस्था; रस्त्याकडेला विकावा लागतोय भाजीपाला? आर्याचा हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आर्यानं तिनं म्हणलेलं लव्हेबल गाणं टाकलं आहे. पावसाळ्याच्या वातावरणातील आर्याचा हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधत आहे. याशिवाय या पोस्टला आर्यानं मस्त कॅप्शन दिलंय. पाऊस आणि कॅलरीज…एक वेगळी प्रेमकथा, असं आर्यानं म्हटलंय.
दरम्यान, आर्यानं नुकतंच टाईपास 3 मधील लव्हेबल गाणं गायलं आहे. याच्याअगोदर तिचं चंद्रमुखीमधील ‘बाई गं’ हे गाणं प्रेश्रकांच्या भेटीला आलं होतं. याशिवाय ती सध्या काय करतेय चित्रपटातील हृदयात वाजे समथिंग आणि कितीदा नव्याने तुला आठवाने ही गाणीही आर्यानं गायली आहेत. याव्यतिरिक्तही अनेक गाणी आर्यानं गायली आहेत. तिच्या आवाजनं तिनं अनेकांना तिच्या प्रेमात पाडलं आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमातून घराघरात आर्या आंबेकरची एक गुणी गायिका म्हणून ओळख झाली आहे. संगीताबरोबरच आर्याने ‘ती सध्या काय करते!’ या सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण केलं होतं. तिच्या अभिनयाचंही प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. दिवसेंदिवस आर्याची लोकप्रियता वाढत चालली आहे.