मुंबई, 27 जुलै- सध्या फिल्मसिटीमध्ये अनेक मालिकांटे शुटिंग सुरू आहे. अशातच अधून-मधून मालिकांच्या सेटवर बिबट्या घुसल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशातच आता एका मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे. मानवी वस्तीत जंगली प्राण्याचा वावर हल्ली वाढल्याचं दिसून येत आहे. सध्या मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये बिबट्या आल्यानंतर सेटवरचे लोक सैरभेर पळताना पाहायला मिळत आहे. यावेळी सेटवर 200 लोक होते. त्यांमुळे या लोकांना जीवाच्या भीतीनं पळता भूय थोडी झाली होती. काल (26 जुलै रोजी) मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये एका मराठी टीव्ही मालिकेच्या सेटवर बिबट्या आपल्या बछड्यासह घुसला. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “सेटवर २०० हून अधिक लोक उपस्थित होते, एखाद्याला जीव गमवावा लागला असता. गेल्या 10 दिवसांत बिबट्या शिरल्याची ही तिसरी किंवा चौथी घटना आहे. वाचा- 60 कोटींच्या आलिशान घरात राहते क्रिती सॅनन; कोट्यवधी आहे अभिनेत्रीची नेटवर्थ ही बाब सरकार गांभीर्याने घेत नसल्याचं सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी सांगितले. बिबट्या खुल्लेआम वावरत असल्याने 200 लोकांचा जीव पुन्हा एकदा धोक्यात आला आहे.सरकार यावर ठोस उपाययोजना करत नसल्याचे देखील त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.
#WATCH | A leopard, along with its cub, entered the sets of a Marathi TV serial in Goregaon Film City, Mumbai yesterday.
— ANI (@ANI) July 27, 2023
All Indian Cine Workers Association president Suresh Shyamlal Gupta says, "More than 200 people were present at the set, someone could have lost life. This… pic.twitter.com/m1YgSXARl6
18 जुलैलाही मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये मराठमोळी बालकलाकार मायरा वैकुळची हिंदी मालिका नीरजा च्या सेटवर आणि आणखी एका हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या फिरताना दिसला होता. याचा देखील व्हिडिओ समोर आला होता. या घटना ताज्या असताना आता आणखी एक घटना समोर आली आहे.