मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्रभासच्या चाहत्याची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

प्रभासच्या चाहत्याची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

आज साऊथ सुपरस्टार प्रभासच्या एका चाहत्याने जे भयानक कृत्य केलं आहे ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

आज साऊथ सुपरस्टार प्रभासच्या एका चाहत्याने जे भयानक कृत्य केलं आहे ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

आज साऊथ सुपरस्टार प्रभासच्या एका चाहत्याने जे भयानक कृत्य केलं आहे ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

मुंबई, 15 मार्च-  कलाकार आणि चाहते यांचं अतूट नातं आहे. चाहत्यांशिवाय कलाकार मोठा होऊच शकत नाही. चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी  (Film Stars & Fans)  वाटेल त्या गोष्टी करायला तयार असतात. परंतु आज साऊथ सुपरस्टार प्रभासच्या एका चाहत्याने जे भयानक कृत्य केलं आहे ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. बाहुबली फेम अभिनेता प्रभास (Prabhas)  आणि अभिनेत्री पूजा हेगडे  (Pooja Hegde)  यांचा बहुचर्चित 'राधे श्याम' (Radhe Shyam)   हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला आहे.परंतु या चित्रपटाला हवा तसा रिस्पॉन्स मिळताना दिसून येत नाहीय. हीच गोष्ट प्रभासच्या एका चाहत्याला सहन झाली नाही, आणि त्याने टोकाचं पाऊल उचलत सर्वांनाच हादरवून सोडलं आहे.

बाहुबली या चित्रपटानंतर प्रभास दक्षिणेतच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाला आहे. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच लोक त्याच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, आता अभिनेत्याच्या एका 24 वर्षीय चाहत्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचं धक्कादायक कृत्य घडलं आहे. हे प्रकरण आंध्र प्रदेशमधील टिळक नगरचं आहे. हे गाव आंध्र प्रदेशातील कर्नूल या जिल्ह्यांतर्गत येतं. रवी तेजा असं या चाहत्यांचं नाव आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रवी तेजा हा अभिनेता प्रभासचा डाय हार्ट फॅन होता. दरम्यान नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रभासच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट हवा तास प्रभाव प्रेक्षकांवर पाडू शकला नाही. आपल्या आवडत्या कलाकाराला मिळत असलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे रवीने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तीने आपल्या आईला चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल सांगितले होते. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

(हे वाचा:The Kashmir Files' च्या प्रमोशनला कपिलने दिलेला नकार?अनुपम यांनी उघड केलं सत्य )

या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. राधा कृष्ण कुमार यांनी 'राधे श्याम'चं दिग्दर्शन केलं आहे. या व्यतिरिक्त अभिनेत्री भाग्यश्री, सत्यराज, कृष्णम राजू, जगपती बाबू, सचिन खेडकर, प्रियदर्शी, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर आणि जयराम या कलाकारांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Prabhas, South indian actor