आत्महत्या करण्याआधी कुशल पंजाबीनं केला होता शेवटचा कॉल, सांगितलं...

आत्महत्या करण्याआधी कुशल पंजाबीनं केला होता शेवटचा कॉल, सांगितलं...

कुशलनं शेवटचा कॉल नेमका कुणाला केला आणि काय बोलणं झालं होतं? कुशलच्या निधनानंतर मोठा खुलासा

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : अभिनेता कुशल पंजाबीच्या निधनानं टीव्ही इंडस्ट्री ते सामान्य व्यक्ती पर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. टीव्ही आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कुशल पंजाबीनं गुरुवारी टोकाचं पाऊल उचलत फाशी घेऊन आपलं जीवन संपवलं. 37 वर्षीय या अभिनेत्यानं नैराश्यामुळे गळफास घेत आत्महत्या केली. कुशलच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यानं आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं म्हटलं आहे. दुसरीकडे कुशलचा सर्वात जवळचा मित्र असलेला चेतन हंसराजने काही खुलासे केले आहेत. कुशलच्या निधनाआधी शेवटचं बोलणं माझ्यासोबत झालं असं कुशलचा मित्र चेतननं सांगितलं. त्यावरून सगळ्यांनाच अनेक प्रश्न पडले आहेत.

चेतन हंसराजची कुशल पंजाबीचा सगळ्यात जवळचा मित्र अशी इंडस्ट्रीत ओळख आहे. 'कुशल गेल्याचं समजल्यानं माझं मन विचलित झालं आहे. माझं शरीर अजूनही थरथर कापत आहे. 37व्या वर्षी कुशलचं असं जाणं अनपेक्षित होतं. वैवाहिक कलहामुळे नैराश्यातून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा असंही आम्हाला वाटतं. ख्रिसमसच्या आदल्यादिवशी म्हणजेच 24 डिसेंबरला संध्याकाळी कुशल आणि माझं फोनवर बोलणं झालं. कुशलने फोनवर त्याचा ख्रिसमसचा प्लॅन सांगितला.' असं चेतनने स्पॉटबॉयसोबत बोलताना सांगितलं आहे.

'25 डिसेंबरला टंडनच्या ख्रिसमस पार्टीत सहभागी होणार असल्याचं त्याने मला सांगितलं. तो पार्टीतही आला. कुशलने पार्टी खूप छान एन्जॉय केली. शिल्पा सख्लानी, अपूर्व अग्निहोत्री आणि मीत ब्रदर्स यांच्यासोबत कुशलने खूप मजा केली. इतकी छान पार्टी झाल्यानंतर कुशल असं काही धक्कादायक पाऊल उचलेलं असं आम्हाला कुणालाच वाटलं नाही', असंही कुशलचा खास मित्र चेतन हंसराजने सांगितलं.

त्याचा मित्र चेतन हंसराजनं दिलेल्या माहिती नुसार त्याचे त्याच्या पत्नीसोबतचे संबंध बिघडले होते. त्यामुळे तो खूप निराश होता. त्याच दरम्यान तो खूप आजारीही होता असंही चेतनने सांगितलं. आत्महत्या करण्यापूर्वी कुशलनं त्याची पत्नी आणि मुलाची भेट घेतली होती. शनिवारी कुशल पंजाबीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कुशलला श्रद्धांजली वाहिली.

याआधी पोलिसांना कुशलच्या घरात एक सुसाईड नोट सापडली होती. या दीड पानी नोटवरुन दिसून येत की तो नैराश्यग्रस्त परिस्थिती होता. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असं त्यानं या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं. तसेच त्यानं त्याची सर्व संपत्ती 2 भागात वाटली आहे. त्याच्या एकूण संपत्तीपैकी 50 टक्के भाग हा त्याच्या आई-वडीलांच्या नावे करण्यात आला आहे तर उरलेला 50 टक्के भाग हा त्याचा 3 वर्षाचा मुलगा कियानच्या नावे करण्यात आला आहे. कुशल पंजाबीच्या मृत्यूनंतर त्याच्या जवळाच्या सर्वच व्यक्तीना धक्का बसला आहे.

दरम्यान टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कुशलचा जवळचा मित्र चेतननं सांगितलं, 'हो त्यानं आत्महत्त्या केली. त्याचे त्याच्या पत्नीशी वाद होत असतं तिच्यापासून वेगळं होण्याच्या दुःखामुळे तो मागच्या काही दिवसांपासून खूप निराश आणि आजारी सुद्धा होता. काही दिवसांपूर्वीच माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यानं या गोष्टींचा उल्लेख करत खूप डिस्टर्ब असल्याचंही सांगितलं होतं. मी त्याची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला होता. पण तो असं काही करेल असा मी कधीच विचार केला नव्हता.'

कुशलनं त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. त्यानंतर त्यानं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं होतं. 'लव मॅरेज', 'सीआयडी', 'जिंदगी विन्स' या त्याच्या गाजलेल्या मालिका आहेत. याशिवाय सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काही सिनेमातही त्यानं काम केलं होतं.

First published: December 29, 2019, 7:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading