मुंबई, 15 जुलै- भारतीय क्रिकेट टीमच्या सर्वात यशस्वी कॅप्टनमधील एक म्हणून सौरभ गांगुलीला (Saurabh Ganguli) ओळखलं जातं. नुकताच सौरभवर आधारित बायोपिक बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार सौरभ गांगुलीने यासाठी ग्रीन सिग्नल दाखवला आहे. तसेच अभिनेता रणबीर कपूर सौरभची भूमिका साकारू शकतो अशी चर्चादेखील सोशल मीडियावर सुरु आहे. तर दुसरीकडे KRK म्हणजेच कमाल राशीद खानने या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्याची इच्छा व्यक्त केली आहे. KRK ने सौरभ गांगुलीच्या बयोपिकची कथा लिहिण्याची इच्छा जाहीर केली आहे. KRK नुकताच एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यानं म्हटलं आहे, ‘सौरभ गांगुलीवर आधारित बायोपिक लिहिण्यासाठी मी जगातला सर्वात उत्तम लेखक आहे. कारण मला गांगुली आणि नगमाच्या लव्हस्टोरीचे सर्व किस्से माहिती आहेत. माझी मैत्रीण नगमाने मला त्यांच्या नात्यातील एक आणि एक गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे मेकर्सने जर यामध्ये काही खोटं दाखवलं तर मी याला झिरो देणार. KRK च्या या ट्वीट सध्या खुपचं चर्चा होतं आहे. सर्वच लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. (हे वाचा:
राजच्या आठवणीत पुन्हा भावुक झाली मंदिरा; 25 वर्षांच्या आठवणींना दिला उजाळा
) KRK सतत आपल्या विधानांनी चर्चेत असतो. सध्या तो अनेक कलाकारांचं भविष्य सांगत आहे. नुकताच त्याने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाबद्दल भविष्यवाणी केली होती. त्याने अशाप्रकारच ट्वीट करत त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, की या दोघांचं लग्न पण होणार आणि पुढे घटस्फोटसुद्धा होणार. त्याने ट्वीट करत लिहिलं होतं, ‘भविष्यवाणी 8- रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं लग्न 2022 च्या शेवटापर्यंत होईल. आणि इतकच नव्हे तर 15 वर्षानंतर या दोघांचा घटस्फोटदेखील होईल’. याआधी KRK ने करीना कपूर आणि प्रियांका चोप्राच्या घटस्फोटाची भविष्यवाणीसुद्धा केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.