कृती सनाॅनचे ठुमके पाहायचेत? मग आओ कभी हवेली पे

काही दिवसांपूर्वी मिलेगी मिलेगी हे गाणं रिलीज केलं होतं. आता 'स्त्री'मधला कृती सेनाॅनचा ठुमका पाहायला मिळणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2018 09:01 AM IST

कृती सनाॅनचे ठुमके पाहायचेत? मग आओ कभी हवेली पे

मुंबई, 22 आॅगस्ट : सध्या राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री' सिनेमाची चर्चा जोरात सुरू आहे. हा हाॅरर काॅमेडी सिनेमा आहे. या सिनेमाचं एक एक गाणं युट्युबवर रिलीज करतायत. काही दिवसांपूर्वी मिलेगी मिलेगी हे गाणं रिलीज केलं होतं. आता 'स्त्री'मधला कृती सेनाॅनचा ठुमका पाहायला मिळणार आहे.

हे गाणं हाॅरर थिममध्ये शूट केलंय. कृती अगोदर एक हडळ दिसतेय. नंतर तिचं एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर होतं. तिच्याबरोबर बादशहा आणि राजकुमार रावही नाचताना दिसतायत. कृती राजकुमारसोबत बरेली की बर्फी सिनेमात दिसली होती. या सिनेमात ती आयटम साँगच करणार आहे.

आओ कभी हवेली पे गाण्यात आवाज आहे निकिता गांधी आणि बादशहाचा. सचिन-जिगरनं सिनेमाला संगीत दिलंय. अमर कौशिकनं सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

सिनेमाची कथा एका स्त्रीभोवती फिरते. ती पुरुषांना पळवून नेते. आणि निशाणी म्हणून त्या पुरुषाचे कपडे तिथे टाकून निघून जाते. हाॅरर काॅमेडी असलेला हा सिनेमा चांगला बिझनेस करेल, असा बाॅक्स आॅफिस दिग्गजांचा अंदाज आहे.

Loading...

काही दिवसांपूर्वी सिनेमाचं कमरिया गाणं रिलीज केलं गेलं. त्यात नोरा फतेहीचे ठुमके पाहायला मिळाले होते. अमर कौशिकनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

राजकुमार रावची न्यूटनमधली भूमिका गाजली होती. त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

वर्षीचा एशिया पॅसिफिक अॅवाॅर्ड मिळालाय. 'न्यूटन'मधल्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय. ब्रिसबन इथे हा सोहळा रंगला होता. याच सोहळ्यात न्यूटनला सर्वोत्कृष्ट पटकथेचाही पुरस्कार मिळालाय.

पुरस्कार स्वीकारताना राजकुमार म्हणाला, ' चांगली कथा आणि चांगली कामं म्हणून हा पुरस्कार मिळालाय. त्यामुळे हा अॅवाॅर्ड सिनेमाचा आहे.' राजकुमार रावनं हा पुरस्कार आपल्या आईला समर्पित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 09:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...