अभिनेत्री क्रिती सेननने (Kriti Sanon) बाॅलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळं असं स्थान मिळवलं आहे.
क्रिती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. नेहमीच निरनिराळे फोटो शेअर करुन ती चाहत्यांना अवाक् करत असते. अशातच क्रितीनं नवीन फोटोशूट (Kriti Sanon New Photoshoot)केलं असून तिनं फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
क्रितीचं नवं फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. क्रितीनं गुलाबी रंगाच्या शाॅर्ट ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. तिच्या या लूकनं चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत. क्रितीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
क्रितीच्या व्हायरल होत असलेल्या फोटोंवर सध्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. चाहत्यांनी क्रितीचीच्या फोटोंवर कमेंटचा आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
क्रितीचा नुकताच प्रदर्शित झालेला बच्चन पांडे चित्रपट जास्त कमाई करु शकला नाही. मात्र चित्रपटातील क्रितीच्या भूमिकेचं चाहत्यांकडून कौैतुक होत आहे.