मुंबई, 29 ऑगस्ट: डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. कॉफी विथ करणचा सातवा सीझन सुरु झाल्यापासून शोविषयी सोशल मीडियावर अनेक बातम्या फिरत आहे. सेलिब्रेटींविषयी अनेक किस्से, खुलासे, धमाल, मस्ती पहायला मिळत आहे. याशिवाय अनेक गुपितं देखील उघड झालेली पहायला मिळतायेत. अनेक लोकप्रिय कलाकारांनी आत्तापर्यंत या सीझनला हजेरी लावली असून पुढच्या एपिसोडच्या कलाकारांची चर्चा सुरु आहे. अशातच पुढच्या एपिसोडचा प्रोमो समोर आलेला आहे. ‘कॉफी विथ करण 7’च्या नवव्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला असून काही क्षणातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला पहायला मिळाला. पुढच्या भागात पाहुणे सेलिब्रिटी अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सेनन पहायला मिळणार आहेत. प्रोमोमध्ये दिसतंय की, करण नेहमीप्रमाणे सेलिब्रिटींना प्रश्न विचारत आहे. ‘हिरोपंती’मध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिला अनेक ऑडिशनमध्ये नाकारण्यात आले आहे का?, असं करण क्रितीला विचारतो. यावर क्रिती म्हणते माझी पहिली ऑडिशन कोणती होती माहितीये का?, ‘स्टुडंट ऑफ द इयर’. हे ऐकूण करणही आश्चर्यचकित होतो.
क्रिती सेननने यावेळी टायगर श्रॉफला डेट न करण्याचे कारणही सांगितलं. टायगर खूप फ्लिप करतो, म्हणून तिने कधीही अभिनेत्याला डेट केले नाही. करण रॅपिड फायर राऊंडमध्ये टायगरला विचारतो की, तुला रणवीर सिंह पासून कोणत्या गोष्टीविषयी जेलेसी होती. यावर टायगर म्हणतो, त्याची बायको. त्याच्याकडे खूप सुंदर आणि प्रतिभाशाली बायको आहे. हेही वाचा - Shehnaaz Gill करणार मोठा धमाका; दिवाळीला चाहत्यांना देणार खास गिफ्ट दरम्यान, हा एपिसोड बुधवारी रात्री 12 वाजता डिस्नी प्लस हॉट स्टारवर प्रसारित होणार आहे. या शोचा प्रोमो करण जोहरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यासोबत त्यानी लिहिले आहे, ‘खूप हिरोपंती, संभाषण आणि मस्ती’. क्रिती आणि टायगरचे चाहते त्यांच्या भागासाठी खूप उत्सुक आहेत. त्यामुळे या भागात आणखी काय पहायला मिळणार, काय गुपित उघडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

)







