जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / हॉट दिसण्यासाठी अभिनेत्रीने घातला असा ड्रेस की चालणं-बसणंही झालं अवघड, पाहा VIDEO

हॉट दिसण्यासाठी अभिनेत्रीने घातला असा ड्रेस की चालणं-बसणंही झालं अवघड, पाहा VIDEO

Kim Kardashian

Kim Kardashian

अनेवेळा अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी खूप विचित्र कपडे परिधान करतात. ज्या कपड्यांमध्ये त्या स्वतः कप्म्फर्टेबल नसतात असेही कपडे ते परिधान करताना दिसून येतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 सप्टेंबर : अनेवेळा अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी खूप विचित्र कपडे परिधान करतात. ज्या कपड्यांमध्ये त्या स्वतः कप्म्फर्टेबल नसतात असेही कपडे ते परिधान करताना दिसून येतात. अशीच काहीशी घटना एका अभिनेत्रीसोबत घडलीये. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिनं परिधान केलेल्या ड्रेसवरुन तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. किम कार्दशियन पुन्हा एकदा तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. नुकतंच किमने मिलान फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी तिने सिल्व्हर कलरचा बॉडिकॉन गाऊन परिधान केला होता. या फॅशनेबल गाऊनने मात्र तिची पुरती तारंबळ उडवलेली पहायला मिळाली. या गाऊनमुळे तिला धड चालता येईना की बसता येईना.

जाहिरात

किमच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, तिला व्यवस्थितरित्या चालताही येत नाही. पायऱ्या चढताना अक्षरशः तिला उड्या माराव्या लागत आहे. तिच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये घातलेल्या गाऊनमुळे चांगलंच ट्रोल केलं जातंय. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, किम कार्दशियनचा प्रत्येक लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओही किमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात