टीव्ही मालिका नागिन 3 फेम अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या तिच्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे खूप चर्चेत आहे.
करिश्मा तन्ना सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
करिश्मानं शेअर केलेल्या या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
समुद्र किनाऱ्यावरील बोल्ड बिकिनी फोटो शेअर करताना करिश्मानं त्याला, ‘मेजर मिसिंग’ असं कॅप्शन दिलं आहे.
करिश्माच्या या फोटोंवर तिचा बॉयफ्रेंड पर्ल पुरीनंही कमेंट केली आहे. त्यानं करिश्माच्या या बिकिनी लुकवर हॉट इमोजी पोस्ट केल्या आहेत.
याशिवाय या फोटोंवर तिची बेस्ट फ्रेंड आणि निर्माती एकता कपूरनं सुद्धा कमेंट केली आहे. तिनं, ‘तू नक्की काय मिस करत आहे असं विचारलं आहे.’
याआधी ती एकता कपूरच्या नागिन 3 या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिनं सुरुवातीला नागिन रुहीची भूमिका साकारली होती. त्यानंतर मालिकेच्या शेवटी ती खलनायकी भूमिकेत दिसली होती.