मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे खतरों के खिलाडी च्या पुढच्या भागातली स्पर्धक होणार म्हणून.
सध्या अमृता खतरों के खिलाडीच्या शूटिंगसाठी बल्गेरियामध्ये आहे. तिथले काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अमृता या फोटोंमधून परफेक्ट स्पोर्ट्सवेअर गोल्स देत आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मागच्या दोन सीझनमध्ये रिअलिटी शोला चांगला टीआरपी मिळाला. त्यामुळे मेकर्सने 10 वा सीझन करण्याचा विचार केला.
खतरों के खिलाडीचा आठवा सिझन अभिनेता शंतनू महेश्वरीने जिंकला तर नववा सिझन कोरिओग्राफर पुनीत पाठकने जिंकला होता.
यंदाच्या या सीझनमध्ये अमृता व्यतिरिक्त, अदा खान, आर जे मलिष्का, करिश्मा तन्ना, तेजस्विनी प्रकाश, राणी चटर्जी या अभिनेत्री सुद्धा सहभागी झाल्या आहेत.
अमृतानं आतापर्यंत अनेक रिअलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. मात्र अशाप्रकारेच्या स्पोर्ट्स रिअलिटी शोमध्ये सहभागी होण्याची तिची पहिलीच वेळ आहे.
खतरों के खिलाडीच्या सीझन 10 चं सूत्रसंचालन नेहमीप्रमाणे रोहित शेट्टी करणार आहे. मागच्या दोन्ही सीझन प्रमाणे या सीझनलाही चांगला प्रतिसाद मिळेल असं म्हटलं जात आहे.