जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तुझी स्वप्न पूर्ण करण्यात मी तोकडाच पडतोय' केदार शिंदेंची बायकोसाठी खास पोस्ट

'तुझी स्वप्न पूर्ण करण्यात मी तोकडाच पडतोय' केदार शिंदेंची बायकोसाठी खास पोस्ट

'तुझी स्वप्न पूर्ण करण्यात मी तोकडाच पडतोय' केदार शिंदेंची बायकोसाठी खास पोस्ट

नुकताच केदार शिंदे यांनी बायकोसोबत ( Kedar Shinde latest post for wife) एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. सध्या केदार शिंदे यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 मे- मराठीतल्या दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे ( Kedar Shinde). सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, तू तू.. मी..मी.. गेला उडत, गोपाळा रे गोपाळा अशी नाटकं. हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, साहेब बिबी आणि मी या मालिका ऑन ड्युटी चोवीस तास, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे अशा सिनेमांचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. केदार शिंदे हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. नुकताच त्यांनी बायकोसोबत ( Kedar Shinde latest post for wife) एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. सध्या केदार शिंदे यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. केदार शिंदे यांच्या पत्नीचं नाव बेला शिंदे (  bela shinde ) आहे. त्यांच्या लग्नाल नुकतीच 26 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त त्यांनी बायकोसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज आपल्या लग्नाला 26 वर्ष पुर्ण झाली. खरतर तू पळून जाऊन लग्न करण्याच्या निर्णयाला होकार दिलास, तेव्हा या क्षेत्रात मी धडपड करत होतो. तुझं आयुष्यात येण माझ्यासाठी भाग्यशाली ठरलं. म्हणजे एकाच रात्रीत आकाशाला हात लागले असं नाही. मात्र एक दिशा मिळाली पुढच्या प्रवासाची.

जाहिरात

आजही आपण धडपडतोच आहोत. स्वामी कृपेने दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था चोख आहे. मात्र, तुझी खूप स्वप्न पूर्ण करण्यात मी तोकडाच पडतोय. माझा ECG सारख्या करीयर ग्राफ! तू नेहमीच प्रत्येक चढ उतार क्षणी,साथ देतेयसं!!स्वामी म्हणतात “ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” आणि तुझं म्हणणं असतं “मी तुझ्या सोबत आहे”. तुम्हा दोघांच्यामुळेच मी पुढची वाटचाल करणार आहे. मला “सना” सारखं गोड स्वप्न प्रत्यक्षात दिलस. तुम्हा दोघांसाठीच आयुष्यभर जगेन, धडपडेन….. @belashinde केदार शिंदे यांच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात