मुंबई 13 जुलै: करोना विषाणूच्या (coronavirus) वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. निर्मात्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अर्थव्यवस्थेचं थांबलेलं चाक पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी काही निर्मात्यांनी OTT प्लॅटफॉर्मचा रस्ता निवडला. त्यांनी आपले चित्रपट नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार या वेब प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केले. मात्र रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांचे बिकट दिवस अद्याप संपलेले नाहीत. (Marathi Play) अशा लोकांसाठी तरी नाटकं सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निर्माते केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केली आहे.
“राजकीय लोकांची जोरदार नाटकं सुरू असताना झालेल्या गर्दीत कोरोना गुदमरून मरतो. पण रंगभूमीवर आमच्या नाटकांना मात्र कोरोनाची भीती दाखवून मनाई...”
‘बाई, बुब्स आणि ब्रा’; प्रवीण तरडेनं दिला हेमांगी कवीला पाठिंबा
राजकीय लोकांची जोरदार "नाटकं" सुरू असताना, झालेल्या गर्दीत कोरोना गुदमरून मरतो... पण रंगभूमीवर आमच्या "नाटकांना" मात्र कोरोनाची भीती दाखवून मनाई... #रंगभूमीसुरूकरा
— Kedar Shindde (@KedarShindde) July 13, 2021
“याठिकाणी आणि त्याठिकाणी... एवढच म्हणत, सामान्य माणसाला या राजकीय नेत्यांनी जिथल्या तिथेच ठेवण्याचा चंग बांधला आहे... टेनिस, फुटबॉल, क्रिकेट सामने पहाणारे परदेशी प्रेक्षक मास्क शिवाय पाहीले की, वाटतं कोरोनासाठी आपली तोंड बंद केली आहेत की, आपल्याला बोलूच द्यायाचं नाही आहे?” अशी एकामागून एक दोन ट्विट्स करून केदार शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारला जोरजार टोला लगावला आहे. शिवाय रंगभूमी पुन्हा एकदा सुरु करावी अशी मागणी देखील केली आहे. यापूर्वी अशीच काहीशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी देखील केली होती.
‘ब्रा घालायची की नाही त्या बाईला ठरवू द्या’; हेमांगी कवीनं ट्रोलर्सची बोलती केली बंद
याठिकाणी आणि त्याठिकाणी... एवढच म्हणत, सामान्य माणसाला या राजकीय नेत्यांनी जिथल्या तिथेच ठेवण्याचा चंग बांधला आहे... टेनिस, फुटबॉल, क्रिकेट सामने पहाणारे परदेशी प्रेक्षक मास्क शिवाय पाहीले की, वाटतं कोरोनासाठी आपली तोंड बंद केली आहेत की, आपल्याला बोलूच द्यायाचं नाही आहे?
— Kedar Shindde (@KedarShindde) July 12, 2021
आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8535 नवे रुग्ण आढळले असून 6013 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 156 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्याचा मृत्युदर 2.04 टक्के एवढा नोंदवला गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण मात्र सुधारत असून राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.02 टक्के एवढा नोंदवला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Entertainment, Stage play