
साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसलेली आणि नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'उल्लू' वेब मालिका 'कविता भाभी' फेम अभिनेत्री कविता राधेश्यामने तिच्या नवीन इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अनेक ट्रोलर्सना लक्ष्य केलं आहे. तिला खासगी जीवनाविषयी प्रश्न विचारणाऱ्या अनेकांना तिनं उत्तर दिलं

खरं तर, अनेक ट्रॉलर्सनी कविता भाभीच्या आधीच्या पोस्टवर कमेंटमध्ये आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आणि तिच्या रिलेशनशीप विषयावर काही प्रश्न उपस्थित केले.

वारंवारच्या कमेंटवर तिनं आता एकदाच झणझणीत उत्तर दिलं आहे. एका अतिशय सेक्सी पोस्टमध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिल की, 'मित्रांनो मी सध्या कुणाशीही रिलेशनशीपमध्ये नाही, माझं लग्नही झालेलं नाही. मात्र, पुढील 5 वर्षांमध्ये मी कोणाची तरी असेन माझे लग्न होईल. पण काही झालं तरी माझा पार्टनर नक्कीच माझ्यापेक्षा लहान असेल येवढं मात्र नक्की सांगतो. त्यामुळं आता तरी माझ्याविषयी काहीही उलट सुलट अफवा उठवणे बंद करा.

कविता भाभी फेम ही अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर तिचे 2 लाखाहून अधिक फॅन-फॉलोअर्स आहेत. तिच्या फोटोसाठी आणि नव्या पोस्टचे हे सर्व दिवाने आहेत.

2012 मध्ये कवितांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव पाच तास, पाच कोटी, असे होते. या चित्रपटात कविताचा खूपच बोल्ड अवतार पाहायला मिळाला होता. त्यावरून तिला भारताची किम कार्देशियन असंही म्हटलं जावू लागलं.

ओटीटी प्लेटफॉर्म 'उल्लू' (Ullu) मध्ये कविताची वेब सीरीज 'कविता भाभी' (Kavita Bhabhi) खूपच वादग्रस्त ठरली होती. या वेबसीरिजमध्ये तिचे खूपच हॉट सीन पाहायला मिळाले.

कविताला क्वीन ऑफ वेब सीरिजचा स्टेटस मिळाला आहे. केवळ कविता भाभीच नाही तर तिच्या इतर अनेक वेब सीरिजही अलिकडे चर्चेत आहेत.




