त्यांनी हा किल्ला ऑसमॉस कंपनीला विकला. ऑसमॉस कंपनीने या किल्ल्याचा आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. त्यानंतर हे हॉटेल सिक्स सेन्स ग्रुपला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे.
हा किल्ला सुमारे 800 वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते. हे हॉटेल १५ ऑक्टोबरलाच सुरू करण्यात आले आहे. याच्या लॉन्च प्रसंगी, फिल्मस्टार मलायका अरोरा पहिली सेलिब्रिटी म्हणून येथे पोहोचली होती.
त्यानंतर आता कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न येत्या काही दिवसांत या भव्य हॉटेलमध्ये होणार असल्याची चर्चा सुरू आहे. हॉटेल व्यवस्थापनाने अद्याप याला दुजोरा दिला नसला तरी त्याची चर्चा जोरात सुरू आहे.
या आलिशान हॉटेलमध्ये शेकडो खोल्या आहेत. हॉटेलच्या खोलीचे 24 तासांचे भाडे सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाची बातमी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. अलीकडे त्यांच्या एंगेजमेंटच्या चर्चाही मनोरंजन विश्वात रंगल्या होत्या. आता सर्वांच्या नजरा राजस्थानच्या या खास किल्ल्याकडे लागल्या आहेत की दोघेही इथे लग्न कधी करणार.