Titanic च्या यशानंतर केट विन्स्लेटची परिस्थिती झाली होती वाईट; नुकत्याच एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा

Titanic च्या यशानंतर केट विन्स्लेटची परिस्थिती झाली होती वाईट; नुकत्याच एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा

नुकत्याच तिनं एका मुलाखतीत ही खासगी बाब व्यक्त केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जानेवारी : हॉलिवूडची (Hollywood) अभिनेत्री (actress) केट विन्स्लेट (Kate Winslet) ही एक सुंदर आणि तितकीच प्रतिभावंत कलाकार. टायटॅनिक सिनेमानंतर तिला खूप प्रसिद्धी आणि चाहत्यांचं प्रेम मिळालं. नुकत्याच तिनं एका मुलाखतीत एक खासगी बाब व्यक्त केली आहे.

जेम्स कॅमेरून यांनी दिग्दर्शित केलेल्या टायटॅनिक (Titanic) सिनेमात केट नायिका होती. या सिनेमानं तिला जगभरात एक ओळख दिली. शिवाय तिचं आयुष्यच यातून बदलून गेलं. अभिनेता लिआर्नाडो डी कॅप्रिओसोबत जुळलेली तिची केमिस्ट्री आजही लोकांना मोहात पाडते. टायटॅनिक ब्लॉकबस्टर हिट झाली. केट एका रात्रीत सुपरस्टार (superstar) बनली. मात्र आता केटनं एक खुलासा केला आहे.

डेलीमेलनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. WTF विथ मार्क मरोन या पॉडकास्टमध्ये बोलताना केट म्हणाली, की टायटॅनिक आल्यावर मी एकदमच सेल्फ प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये गेले होते. माझे दिवस आणि रात्री अगदी एकसारख्याच जात होत्या. मी स्वतःशीच खूप विचार करायचे. हा विचार मुख्यतः स्वतःबद्दल असायचा. मी स्वतःवरच शंका घेऊ लागले होते. माझ्यावर तेव्हा खूप टीकाही झाली होती. मुख्यतः ब्रिटिश प्रेसनं (British Press) ही टीका केली होती.'

हे ही वाचा-Microsoft चे संस्थापक बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

ती पुढे सांगते की तिला प्रामाणिकपणे असं वाटायचं, की तिला मुद्दाम भीती घातली जाते आहे, धमकावलं जातं आहे. मी सतत एकच विचार करायचे, की हे लवकर कसं संपेल. अर्थात, काही काळानंतर हे सगळं संपलं मात्र मला एक नक्की कळालं. ते म्हणजे, प्रसिद्ध होणं (Famous) नेमकं काय असतं. मी प्रसिद्ध होण्यासाठी तशी अजिबातच तयार नव्हते.

तेव्हा केटनं मिळालेल्या प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होण्याऐवजी आपल्या अभिनयाला अजून सुंदर बनवण्यासाठी कष्ट घेतले. मात्र अजून इतर भूमिका करण्याबाबत ती संभ्रमातच होती. तिला चुका करायच्या नव्हत्या. ती म्हणते, 'मी अजून चुका कराव्या हे मला आता आवडणार नव्हतं. मला या क्षेत्रात दीर्घकाळ राहायचं होतं. मग मी लहान-लहान गोष्टी शोधत त्यांवर मेहनत घेऊ लागले.' केटनं नुकतंच 19 व्या शतकात बनलेल्या Ammonite या सिनेमात काम केलं आहे.

Published by: News18 Desk
First published: January 18, 2021, 7:39 AM IST

ताज्या बातम्या