मुंबई, 9 जुलै : बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या आयुष्याशी संबंधित सर्व माहिती ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच अभिनेत्रीने एक अल्ट्रासाऊंड रिपोर्ट शेअर केला आहे. ज्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
करिनाने शेअर केला अल्ट्रासाऊंड रिपोर्ट
करिना कपूर (Kareena Kapoor) हिने नुकताच इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करिनाने अल्ट्रासाऊंड रिपोर्ट हातात धरला आहे. जो पाहून चाहत्यांना करिनाकडून गुड न्यूज मिळणार असल्याचं वाटत आहे. मात्र तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर ही प्रेग्नेंन्सीचा अल्ट्रासाऊंड रिपोर्ट आहे. या फोटोमध्ये करिना (Kareena Kapoor) लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ती फोटोमध्ये अल्ट्रासाउंडचा फोटो दाखवित आहे. हा फोटो शेअर करीत ती कॅप्शनमध्ये लिहिते की, काहीतरी रोमांचकारी काम करीत आहे...मात्र तुम्हाला वाटतं तसं काही नाही... वॉच दिस स्पेस फॉर मोर ...#ComingSoon'.
View this post on Instagram
करिना कपूर (Kareena Kapoor) हिने दुसऱ्या पोस्टमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. ती नवं पुस्तक लॉन्च करीत आहे. या पुस्तकात दोन्ही वेळेसच्या प्रेग्नेन्सीदरम्याचे अनुभव लिहिले आहेत. आई होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तिने हा अनुभव शेअर केल्याचं सांगितलं जात आहे.
View this post on Instagram
करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर कॅप्शन लिहिलं आहे - 'हा एक प्रवास आहे, माझी गर्भावस्था आणि माझ्या गर्भावस्थेबद्दल लिहिणं दोन्ही. चांगले आणि वाईट दिवस होते. कधी कधी मी कामावर जाण्यासाठी उतावळी असायचे तर कधी कधी अंथरूणावरुन उठायचाही कंटाळा यायचा. या पुस्तकात माझ्या दोन्ही गर्भावस्थादरम्यानचे शारिरीक आणि मानसिक बदल आणि त्याचा अनुभव आहे. खरं तर हे पुस्तक माझ्यासाठी तिसऱ्या मुलाप्रमाणेच आहे. गर्भावस्थेपासून आज याच्या जन्मापर्यंत @juggernaut.in आणि अद्भूत @chikisarkar द्वारा प्रकाशित.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Kareena Kapoor, Kareena kapoor baby, Pregnancy