कोविड 19 लशीचे दोन्ही डोसघेऊनही करीना कपूर खान कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. आजकाल तिनं स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे आणि ती कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करत आहे. करिना कपूरला दोन मुलं आहेत, तैमूर (Taimur) आणि जेह (Jeh) . आपल्या या दोन्ही लाडक्या मुलांना करिना कपूर मिस करत आहे. हे प्रेम व्यक्त करत तिनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.करिनाने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरमध्ये फोटो शेअर करत म्हटलं आहे, 'कोरोना मी तुझा तिरस्कार करते, मला माझ्या मुलांची आठवण येत आहे. मी लवकरच त्यांना भेटणार'. असं म्हणत करिनानं आपलं मन मोकळं केलं आहे.
याआधी करिनाने कोरोना काळातील प्रेमाबद्दल सांगितलं होतं. तिनं यापूर्वी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये सैफ आणि त्याचे काही कर्मचारी इमारतीच्या छतावर उभं असल्याचं दिसलं होतं. यासोबत तिनं लिहिलं होतं, 'आम्ही कोरोना काळातही एकमेकांच्या प्रेमात आहोत.' कोरोना विषाणूबद्दल पुढं लिहीत म्हटलं होतं, 'मित्रांनो विसरू नका!! ते लपलेले आहेत'.
करिनाची एक घरगुती मदतनीस देखील कोविड-19 पॉजिटीव्ह आहे. 8 डिसेंबरला करिनानं अमृता अरोरा, सीमा खान आणि महीप कपूरसोबत चित्रपट निर्माता करण जोहरच्या घरी डिनर पार्टी केली होती. करण जोहरची दोनदा चाचणी झाली असून प्रत्येक वेळी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचवेळी,महिप आणि संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूरनं नुकतंच सांगितलं आहे की ती कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि ती कोविड नियमांचं पालन करत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.