'....शेवटी विजय त्याचाच होतो' मुलांसोबतचा फोटो शेअर करत करण जोहरची पोस्ट व्हायरल

'....शेवटी विजय त्याचाच होतो' मुलांसोबतचा फोटो शेअर करत करण जोहरची पोस्ट व्हायरल

मुलांसोबतचा फोटो टाकत करण जोहरने (Karan Johar) सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या अतिशय व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 03 जानेवारी: नववर्षाचा उत्साह आपल्यामध्ये अजूनही कायम आहे. आपण सगळेच मोठ्या उत्साहाने नव-वर्ष साजरे करत आहोत. मग बॉलिवूड सेलिब्रिटी कसे मागे राहतील? नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त अनेक कलाकार भटकंतीसाठी परदेशात गेले आहेत. तर कोणी कुटुंबातील लोकांसोबत राहूनच नवीन वर्षाचे पहिले काही दिवस घालवणं पसंत करत आहेत. सगळे कलाकार चाहत्यांना सोशल मीडियावर नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. दिग्दर्शक करण जोहरनेही (Karan Johar) आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरं केलं. करणची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे करणच्या पोस्टमध्ये?

करण जोहर आपली मुलं रुही आणि यशसोबतचा एक फोटो शेअर करत लिहीलं आहे, 'माझं कुटुंब आणि माझे मित्र यांचा मी मनापासून आभारी आहे. ते कायमच माझ्या पाठिशी उभे राहिले आहेत. माझ्या आजबाजूच्या सर्व व्यक्तींचाही मी आभारी आहे. हो हे खरं आहे की, मागचं वर्ष आपल्यासाठी सोपं नव्हतं. त्या वर्षाचं आपल्याला चांगला धडा शिकवला आहे. पण शेवटी विजय त्याचाच होतो जो सगळ्या अडथळ्यांना पार करुन पुढे जातो. आय लव्ह यू ऑल' करण जोहरची ही पोस्ट सध्या खूपच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

इंन्स्टाग्रामवरील करणच्या पोस्टला अनन्या पांडे, मलायका अरोरा, अनिल कपूर, सोनू, सूद, जॅकलिन फर्नांडिस अशा अनेक कलाकारांनी लाइक केलं आहे. करणने शेअर केलेला फोटोदेखील अनेकांना आवडत आहे.2020 हे वर्ष करण जोहर आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊससाठी फारच कठीण गेलं कारण, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्यावरही घराणेशाहीला पाठिंबा दिल्याचा आरोप झाला होता.

Published by: Amruta Abhyankar
First published: January 3, 2021, 7:43 PM IST

ताज्या बातम्या