मुंबई, 10 आॅक्टोबर : कॉमेडी किंग कपिल शर्मा छोट्या पडद्यावर परतणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. कपिलला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता त्याच्या चाहत्यांना जास्त काळ वाट पाहावी लागणार नाहीय. कारण कपिल आता ‘द कपिल शर्मा शो’ या त्याच्या रिअॅलिटी शोचं दुसरं पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कपिलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर याची माहिती दिली. कपिलच्या या नवीन शोचं ‘सोनी टेलिव्हिजन’वर पुनरागमन होणार आहे. बऱ्याच काळापासून कपिल शर्मा टीव्हीपासून लांब होता. तो लांब जरी असला तरी त्याचे फोटोज मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अनेक दिवसांपासून कपिल छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे या चर्चेला उधाण आलं होतं. आता या चर्चेला पूर्णविराम देत कपिलने त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केलीय. कपिलने ट्विटरवर लिहिलंय की, ‘लवकरच परत येतोय.. ‘द कपिल शर्मा शो’ घेऊन तुमच्यासाठी फक्त सोनी टीव्हीवर’. कपिलने त्याच्या या नवीन शोची आनंदाची बातमीतर सगळ्यांनी दिली पण या शोमध्ये त्याच्यासोबत कोण असणार आहे हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. सुनील ग्रोवरसोबतच्या वादानंतर आता कपिलसोबत या शोमध्ये कोण असणार आहे याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. कपिलच्या या ट्विटनंतर अनेक कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एकता कपूर टीव्हीची क्वीन मानली जाणाऱ्या एकता कपूरने त्याचं स्वागत केलं आणि लिहिलंय की, ‘बऱ्याच दिवसांपासून टीव्ही तुझी वाट पाहत आहे कपिल’
Tv is waiting for u Kapil! ❤️🙏🏼
— Ektaa R Kapoor (@EktaaRKapoor) October 7, 2018
भारती सिंग एकता कपूरनंतर कॉमेडी क्वीन भारती सिंगनेदेखील त्याच्यासाठी ट्वीट केलंय. भारती म्हणाली की, ‘लवकर ये परत’. राहत इंदोरी प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांनी त्यांच्या शायरीच्या अंदाजात कपिल शर्माचं स्वागत केलंय. कलाकारांसोबत कपिलच्या फॅन्सनीदेखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Can’t wait Paaji!!!!!! Jaldiiiiiiiii!!!!! 🤗💥✌️🤘🍻👊💕
— Pulkit Samrat (@PulkitSamrat) October 8, 2018
Come bak healthier and funnier.. amazing 🤗
— Aamir Ali (@ali_aamir) October 7, 2018
पवार काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही - नितीन गडकरी