नवी दिल्ली : कला विश्वात सध्या मोठ्या घटना घडत आहेत. सगळ्यांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायकाचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या निधनानं कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कन्नड सुगम संगीतचे बादशाह काळाच्या पडद्याआड गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सुब्बन्ना (Shivamogga Subbanna) यांची सुगम संगीताचे बादशाह म्हणून ओळखलं जात होतं. ते पेशाने वकील होते. मात्र त्यांना गायनाची आवड होती. ही आवड हा छंद त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला. सुब्बन्ना हे सुरुवातीला वकील म्हणून काम करायचे. अगदी नोटरीपासूनची त्यांनी कामं केली. त्यांनी आपला छंदही जोपासला. शिवमोगा सुब्बन्ना यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी 83 व्या वर्षी बंगळुरू इथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
National Award-winning singer Shivamogga Subbanna passes away
— ANI Digital (@ani_digital) August 12, 2022
Read @ANI Story | https://t.co/MmRgu5XGvh#ShivamoggaSubbanna #RIP #ShivamoggaSubbannaDeath pic.twitter.com/Kryh2sMVE3
सुबन्ना यांनी ज्ञानपीठ अवॉर्ड विजेत्या अनेक कवींच्या कवितांना संगीतबद्ध केलं. 1978 रोजी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना ‘काडू कुडुरे ओडी बानडिट्टा’साठी मिळाला.
शिवमोगा सुब्बन्ना यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा आहेत. सुब्बन्ना यांच्या जाण्याने कन्नड कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना ट्वीट करून श्रद्धांजली देखील अर्पण केली.