धक्कादायक! आणखी एका अभिनेत्रीने केली आत्महत्या; सुशांतसारखं पंख्याला गळफास घेऊन स्वतःला संपवलं

धक्कादायक! आणखी एका अभिनेत्रीने केली आत्महत्या; सुशांतसारखं पंख्याला गळफास घेऊन स्वतःला संपवलं

धक्कायदायक! I quit अशी फेसबुकवर पेजवर पोस्ट करत तिने (Jayashree ramaiah) टोकाचं पाऊल उचलत असल्याचे संकेत दिले होते. त्या वेळी कशीबशी ती या नैराश्यातून बाहेर आली होती. तिच्या depression वर उपचारही सुरू होते. पण...

  • Share this:

बंगळुरू, 25 जानेवारी:  सुशांत सिंह राजपूतने ज्या पद्धतीने स्वतःच्या घरात फॅनला लटकून स्वतःला संपवलं, अगदी त्याच पद्धतीने आणखी एका अभिनेत्रीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. कन्नड Bigg Boss मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री जयश्री रामय्या (jayashree ramaiah) हिच्या बाबतीतली ही धक्कादायक बातमी आहे.

जयश्री रमैया हिने गेल्या वर्षी जूनमध्येच सोशल मीडियावर आपण आत्महत्या करणार असल्याचं लिहिलं होतं. त्यावर अनेक जण तिच्यापर्यंत पोहोचले. कानडी सुपरस्टारने तिला काम मिळवून देऊन मदत करण्याचंही सांगितलं आणि त्या वेळी टोकाच्या नैराश्यातून ती कशीबशी बाहेर पडली. जयश्रीवर मानसोपचार सुरू होते. पण ती नैराश्यातून पूर्ण बाहेर येऊ शकली नाही.

कन्नड Bigg Boss च्या तिसऱ्या सीझनमध्ये जयश्री रामय्या सहभागी झाली होती. तिच्याबरोबरच्या अनेक स्पर्धकांना या रिअॅलिटी शोनंतर कुठे ना कुठे काम मिळालं. पण जयश्री त्या बाबतीत खूश नव्हती. तिला अभिनयाच्या क्षेत्रात योग्य संधी मिळाली नाही आणि त्यातूनच तिला नैराश्य आलं. त्याबद्दल तिने तिच्या मित्रमंडळींंना सांगितलं होतं.

24 जून 2020 रोजी या नैराश्यातूनच आपण आत्महत्या करणा असल्याचं तिने Facebook page वर लिहिलं. त्या वेळी कन्नड स्टार किचा सुदीप बंगळुरूच्या संध्या किराना आश्रमात जयश्री रामय्यावर उपचार सुरू होते. पण ती या आजारातून अखेरपर्यंत बाहेर येऊ शकली नाही. सोमवारी ती कुणाचाही फोन उचलत नसल्याचं, मेसेजला उत्तर देत नसल्याचं तिच्या नातेवाईक आणि मित्रांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने ती ज्या आश्रमात उपचार घेत होती, त्यांच्याशी संपर्क साधला.

आश्रमाच्या लोकांनी तिच्या खोलीत प्रवेश केला, त्या वेळी ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. बंगळुरूच्या पोलीस ठाण्यात आत्महत्येसंदर्भात नोंद करण्यात आली आहे.

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यूही अशाच प्रकारे झाला होता. 14 जून 2020 रोजी तो मुंबईत ब्रांद्याच्या त्याच्या फ्लॅटमध्ये फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूसंदर्भात अजूनही चौकशी आणि तपास सुरू आहे.

First published: January 25, 2021, 2:16 PM IST

ताज्या बातम्या