• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ...म्हणून कंगना रणौतने घेतली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट

...म्हणून कंगना रणौतने घेतली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट

सतत कोणाशीतरी पंगा घेणारी बॉलिवूडची क्वीन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगना रणौतने (Kangana Ranaut) देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची भेट घेतली आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 डिसेंबर: बॉलिवूडची पंगा क्वीन गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच चर्चेत येत आहे.  आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण एखाद्या कलाकाराशी किंवा राजकारणी व्यक्तीशी 'वाद' हे त्याचं कारण नाही. अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि तिच्या टीमने रविवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची आगामी ‘तेजस’ या चित्रपटासाठी भेट घेतली. तसंच तिच्या चित्रपटासाठी तिला आशीर्वाद घेतला आणि हवाई दलाकडून काही आवश्यक परवानग्यादेखील घेतल्या. कंगना रणौतने भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. कंगना रणौतने काही फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. यात ती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना आपल्या टीमसह भेटताना दिसत आहे. कंगना रणौतने लिहिलं की, 'आज माननीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आशीर्वाद घेतले आणि तेजसची पटकथा सांगितली केली. हवाई दलाकडून तेसज या सिनेमासाठी आवश्यक त्या परवानग्यादेखील घेतल्या. जय हिंद ' पायलटच्या भूमिकेत दिसणार कंगना तेजस या सिनेमामध्ये कंगना पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवाडा करत आहेत. कंगना या चित्रपटाबद्दल सांगताना म्हणते, 'माझ्या कारकिर्दीत मला एकदा तरी देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकाची भूमिका करायची होती आता ती इच्छा पूर्ण होणार आहे.' कंगनाच्या भेटीदरम्यान तिची बहिणीही तिथे उपस्थित होती. कंगनाने नुकतंच तमिळनाडूचे मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या ‘थलायवी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटात ती जयललितांची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर कंगना रणौत 'धाकड' चित्रपटात दिसणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published: