यापूर्वी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील कंगनाविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. अख्तर यांनी कंगनाविरोधात अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे बदनामी झाल्याची तक्रार केली होती. कंगनावर बदनामी केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे अख्तर यांच्या तक्रारीवर अहवाल सादर करताना पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतर न्यायालयानं कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ती हजर न झाल्याने न्यायालयाने तिच्याविरोधात टक वॉरंट बजावलं. आता कंगनानं देखील अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटला सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे.Mumbai court asks police to register offence against Kangana Ranaut after 'Kashmir Ki Yodhha Rani Didda' author accuses her of copyright violation
— Press Trust of India (@PTI_News) March 12, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Crime, Kangana ranaut, Mumbai police, Police complaint, Social media viral, Troll, Twitter