...आणि म्हणून कंगनाने 'दीपिका बचाओ' मोहिमेला पाठिंबा दिला नाही

...आणि म्हणून कंगनाने 'दीपिका बचाओ' मोहिमेला पाठिंबा दिला नाही

जिने माझ्या चारित्र्याची चेष्टा केली अशा राजकारणी महिलेला मी पाठिंबा देणार नसल्याचंही कंगना म्हणाली.

  • Share this:

6 डिसेंबर : 'पद्मावती' सिनेमाच्या वादामुळे बॉलिवूडच्या अभिनेत्रींमधीलही एक नवा वाद समोर आला आहे. या सिनेमाच्या वादावरून अभिनेत्री दीपिका पदूकोणला जीवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्या. यात दीपिकाच्या समर्थनासाठी अभिनेत्री शबाना आझमीने 'दीपिका बचाओ' अशी मोहिम हाती घेतली. पण कंगना राणावतने शबानाच्या या मोहिमेला पाठिेंबा देण्यास स्पष्ट नकार दिला. जिने माझ्या चारित्र्याची चेष्टा केली अशा राजकारणी महिलेला मी पाठिंबा देणार नसल्याचंही कंगना म्हणाली.

'दीपिका बचाओ' या मोहिमेसाठी शबानाने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सना एकत्र केलं होतं. त्याचबरोबर दीपिकाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शबानानं आग्रहही केला होता. पण सूत्रांच्या माहितीनुसार कंगना राणावतने शबानाच्या या मोहिमेला पाठिंबा देणार नसल्याचं म्हटलं आहे.

या मोहिमेबद्दल बोलताना कंगना म्हणाली की, 'मी माझ्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना मला माझी मैत्रिण अनुष्का शर्माचा फोन आला होता. शबाना आझमीने सुरु केलेल्या मोहिमेच्या पेटीशनवर सही करावीस असं तिने मला सांगितलं. पण मी यावर अनुष्काला समजवलं की, दीपिकाला माझ्याकडून पूर्ण पाठिंबा आहे. पण शबाना आझमीच्या दुटप्पी धोरणावर मी थोडीशी नाराज आहे आणि देशाच्या सध्याच्या स्थितीबद्दल माझी काही वेगळी मतं आहेत.

'दीपिका बचाओ' ही मोहिम एक अशी महिला चालवत आहे ज्या महिलेने एकेकाळी माझ्या चारित्र्याची चेष्टा केली होती. त्यामुळे तिच्या या मोहिमेला पाठिंबा देणं म्हणजे मी पण त्यांच्यातलीच एक आहे असं होईल. मी खूप खुश आहे की अनुष्का माझ्याकडे आली पण जसं मी सांगितलं आहे की दीपिकाला माझ्याकडून पूर्ण पाठिंबा आहे. मी इतर कोणाच्याही मदतीशिवाय दीपिकाला पूर्ण पाठिंबा देऊ शकते.'

कंगनाच्या या बोलण्यामुळे दीपिकाची सुरक्षा तर लांबच राहिली पण बॉलिवूडमधल्या या नव्या वादाला तोंड फूटलं हे नक्की. त्यामुळे आता शबाना आझमी यावर काही प्रतिक्रिया देणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

First published: December 6, 2017, 3:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading