Kangna VS Diljit 2.0: कंगनाने पुन्हा काढली खोड, दिलजीतने असं उत्तर दिलं की...

Kangna VS Diljit 2.0: कंगनाने पुन्हा काढली खोड, दिलजीतने असं उत्तर दिलं की...

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि दिलजीत दोसांझमध्ये (Diljit Dosanjh) पुन्हा एकदा भांडण रंगलं आहे. कंगनाने विचारेल्या प्रश्नाला दिलजीतने मजेदार उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) यांचं मध्यंतरी जोरदार ट्वीटवर वॉर (Twitter War) झालं होतं. कंगना रणौतची शेतकरी आंदोलनाविरोधी वक्तव्य आणि दिलजीत दोसांझची तिच्या ट्वीट्सला जोरदार उत्तरं असा सामना रंगला होता. आता कंगना आणि दिलजीत यांच्यात पुन्हा एकदा वाक् युद्ध रंगण्याची शक्यता आहे. दिलजित सोशल मीडियावर शांत बसला होता, तर कंगनाने त्याची पुन्हा खोड काढली आहे. कंगना रनौत यांनी ट्विट केले, दिलजित कुठे आहे? या नंतर # दिलजित_किथ्थे_आ? हा हॅशटॅग टेंडमध्ये आला की दिलजीतनेही ट्विट करुन प्रत्युत्तर दिले. दिलजितने आपल्याच स्टाईलमध्ये उत्तर देत कंगनाची बोलती बंद केली आहे.

कंगना रणौतच्या ट्वीटवर दिलजीतने उत्तर दिलं, ‘सकाळी उठल्यानंतर मी जिममध्ये व्यायाम केला. त्यानंतर दिवसभर काम आणि मग रात्री झोपायला गेलो’, असं ट्वीट करत दिलजीतने सगळं वेळापत्रकच कंगनासमोर मांडलं आहे. हे ट्वीट करताना दिलजीतने #MeraSchedule  आणि #AaJa #Aaja असे हॅशटॅगही वापरले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना आणि दिलजीतचं भांडण चांगलंच रंगलेलं दिसत आहे. प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) जेव्हा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला तेव्हा कंगनाने तिलादेखील सुनवलं होतं.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 12, 2020, 1:03 PM IST

ताज्या बातम्या