मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मी तुझ्यापेक्षा चांगले स्टंट करते'; कंगनाचं आता थेट टॉम क्रूझला आव्हान

'मी तुझ्यापेक्षा चांगले स्टंट करते'; कंगनाचं आता थेट टॉम क्रूझला आव्हान

कंगना रणौत (Kangna Ranaut tweet) आता हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझमुळे (Tom Cruise) चर्चेत आहे. ती टॉमच्या तुलनेत अधिक चांगली स्टंटबाजी करु शकते असा चकित करणारा दावा कंगनाने केला आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई, 9 फेब्रुवारी : अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranaut tweet)आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. मात्र यावेळी ती हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझमुळे  (Tom Cruise) चर्चेत आहे. ती टॉमच्या तुलनेत अधिक चांगली स्टंटबाजी करु शकते असा चकित करणारा दावा कंगनाने केला आहे.

टॉम क्रूझ हा अभिनेता आपल्या स्टंटबाजीसाठी प्रसिद्ध आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ (Mission: Impossible) या चित्रपट मालिकेत त्याने केलेले स्टंट पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. या चित्रपटांमध्ये त्याने कुठल्याही स्टंट डबलचा वापर केलेला नाही. मात्र अक्शनस्टार टॉमच्या तुलनेत मी चांगले स्टंट करु शकते असा अजब दावा कंगनाने केला आहे. (kangana ranaut latest tweet) “हा...हा...हा... माझी स्तुती ऐकून टीकाकार सध्या जळफळत आहेत. ब्रेव्ह हार्टसारख्या अनेक सुपरहिट हॉलिवूड चित्रपटांमध्ये अक्शन दिग्दर्शन करणारे निक पॉल म्हणाले, मी टॉम क्रूझ पेक्षा चांगली स्टंटबाजी करते. हे ऐकून टीकाकार नक्कीच चकित झाले असणार.” अशा आशयाचं ट्विट करत कंगनाने स्वत:ची तुलना टॉम क्रूजशी केली आहे.

तिने ‘मणिकर्णिका’  (Manikarnika The Queen of Jhansi) या चित्रपटात जबरदस्त अक्शनचं प्रदर्शन केलं होतं. हा चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटातील स्टंट निक पॉल यांनी दिग्दर्शित केले होते. त्यावेळी त्यांनी कंगनाची प्रचंड स्तुती केली होती. दोन वर्षांपूर्वीचा संदर्भ देत कंगनानं टॉम क्रूजवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

First published:

Tags: Kangana ranaut, Tom cruise