बॉलिवूड अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर योग करताना दिसून येत आहे.
तनिषा या फोटोंमध्ये चक्क बिकिनीवर अवघड योगा पोझ करताना दिसून येत आहे. तनिषाने फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहेत.
तनिषा मुखर्जी एका समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे. तसेच हे फोटो शेअर करत तनिषाने ही आपली फेव्हरेट योगा पोझ असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये तनिषा फारच हॉट अँड बोल्ड दिसून येत आहे.
तनिषा स्वतः ला फिट ठेवण्यासाठी अतिशय मेहनत घेत असते. ती सतत एक्सरसाइज करताना दिसून येते. त्यामुळे तनिषा या वयातही अतिशय फिट आणि सुंदर दिसून येते. सर्वानांच तिच्या फिटनेसचं कौतुक आहे.
तनिषा मुखर्जी ही अभिनेत्री काजोलची लहान बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची लेक आहे. आपल्या आई आणि बहिणीप्रमाणे तनिषानेसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अभिनयात आपलं नशीब आजमावलं होतं.
तनिषाने २००३ मध्ये 'sssshhhhh' या सस्पेन्स चित्रपटातुन पदार्पण केलं होतं. मात्र तनिषाला बॉलिवूडमध्ये हवं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे काही चित्रपटांमध्ये अभिनय केल्या नंतर तनिषाने बॉलिवूडला रामराम ठोकला. त्यांनतर तनिषा बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती.