नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन स्टारर 'झुंड' हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत मराठी चित्रपट 'सैराट' फेम अभिनेता आकाश ठोसर देखील आहे. सोशल मीडिया आणि इव्हेंटच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे. दरम्यान चित्रपटाच्या टीमने मुंबईतील एका मैदानात फुटबॉल सामन्याचे आयोजन केले होते. ज्याचे काही फोटो समोर आले आहेत.विरल भयानीने हे फोटो शेअर केले आहेत.
नागराज मंजुळे हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 'झुंड' च्या माध्यमातून ते हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.
पापाराझींसोबत सर्वांचीच नजर अभिनेता आकाश ठोसरवर खिळली होती. कारण 'सैराट'पासून आतापर्यंत आकाशने शारीरिकदृष्ट्या बरेच बदल केले आहेत.
या फोटोंमध्ये आकाश ठोसर नव्या लुकमध्ये दिसून येत आहे. सोबतच तो पूर्वी पूर्वीपेक्षा जास्त ऍक्टिव्ह आणि फिट दिसत आहे.
या फोटोंमध्ये आकाश ठोसर लांब केसांमध्ये दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा स्पोर्ट्स आउटफिट घातला आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही फुटबॉल सामन्यादरम्यान 'झुंड'च्या टीमसोबत फोटोशूट केलं. या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह फुटबॉल सामना पाहण्यासाठी आले होते.
'झुंड' हा फुटबॉलवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. जे गरीब मुलांसाठी फुटबॉल संघ तयार करतात.