जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत स्तंभ...' अभिनेत्याने सांगितलं हातावरील टॅटूचं सत्य

'माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत स्तंभ...' अभिनेत्याने सांगितलं हातावरील टॅटूचं सत्य

'माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत स्तंभ...' अभिनेत्याने सांगितलं हातावरील टॅटूचं सत्य

कतीच सौरभ चौगुलने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या हातवरील टॅटूबद्दल सांगितलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 फेब्रुवारी- कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील अंतरा आणि मल्हार ही जोडी घराघरात प्रसिद्ध आहे. या मालिकेत मल्हारची भूमिका अभिनेता सौरभ चौगुले साकारत आहे. नुकतीच सौरभ चौगुलने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या हातवरील टॅटूबद्दल सांगितलं आहे. सौरभ चौगुले हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध पोस्ट शेअर करत असतो. सौरभ चौगुलेनं इन्स्टावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, लोक नेहमी मला या टॅटूमागचे कारण विचारतात, म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे!.. व्हायरल व्हिडिओनंतर गौतमी पाटीलला तरुणाईचा सपोर्ट, सोशल मीडियावरून केलं आवाहन आजोबा ! माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक! तुम्ही आमच्या सोबत नसला तरी तुमच्या शिकवणीने मला नेहमीच आधार दिला आहे. मला तुमची खरोखर आठवण येत नाही कारण, तुम्ही मला वाटलेले जीवनाचे धडे कायम माझ्यासोबत आहेत. जेव्हा जेव्हा माझ्याकडे कोणत्याही परिस्थितीची उत्तर नसतात तेव्हा मी माझ्या हातावरची तुमची स्वाक्षरी (टॅटू) पाहतो आणि मला जाणवते की तुम्ही माझा हात धरला आहे. त्याद्वारे मला मार्गदर्शन करत आहात. Happy Birthday Ajoba!..तुमचा नातु. सौरभनं इन्टाला त्याच्या हाताचा फोटो तसेच त्याच्या आजोंबाचा फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोंमध्ये सौरभच्या हातावर जो टॅटू आहे तो त्याच्या आजोंबाची सही म्हणजे स्वाक्षरी आहे. त्याच्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त त्याने ही पोस्ट लिहिली आहे. त्याच्या पोस्टवर अनेकांनी अजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

अनेक कलाकार हातावर टॅटू काढताना दिसतं, कोण गर्लफ्रेंडचा नाव काढतं तर कोण लग्नाची तारीख गोंदवून घेतं तर कोण वडिलांचे नाव गोंदवून घेतं. सध्या टॅटूचा चांगलाच ट्रेंड आहे. सौरभ चौगुले हा इंजिनियर असुन स्वतःमधल्या अभिनेत्याला ओळखून त्याने वेळीच आपला कल अभिनयाकडे वळवला . त्याने अभिनयाची सुरवात एकांकिकापासून केली. एकांकिका प्रायोगिक नाटक , राज्य नाट्य संस्था या सगळया माध्यमातून तो रंगभूमिशी एकरूप होत होता.

News18लोकमत
News18लोकमत

अभिनयासोबतच त्याने फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीचंदेखील धडे घेतले आहेत. आणि याचाच फायदा घेऊन त्याने अनेक शॉर्टफिल्म आणि वेबसिरीज यांच छायाचित्रण केले आहे. हे करताना तो अनेक मालिका आणि चित्रपटातून छोटी पात्र तो साकारत होता. अशातच त्याला दक्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत नकारात्मक पात्र साकारायला मिळालं. आणि आता या मालिकेत तो ‘मल्हार’ ही भूमिका साकारत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात