Home /News /entertainment /

तोकड्या कपड्यात रात्री पार्टीला निघाली जान्हवी; बघ्यांच्या गर्दीला 'बॉयफ्रेंड'ही नाही आवरू शकला

तोकड्या कपड्यात रात्री पार्टीला निघाली जान्हवी; बघ्यांच्या गर्दीला 'बॉयफ्रेंड'ही नाही आवरू शकला

जान्हवी कपूर वीकेंडला (Weekend Party) तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत रात्री उशिरा पार्टी करण्यासाठी बाहेर गेली होती. यादरम्यान, तिचे आणि तिच्या मित्रांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.

मुंबई, 16 मे : सामान्य नागरिकांना बॉलिवूड (Bollywood) कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच उत्सुकता असते. कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करतात, हे जाणून घेण्याबाबत अनेकांना रस असतो. या कलाकारांसोबतच त्यांची मुलं-मुली हादेखील चर्चेचा विषय असतो. बॉलिवूड स्टार्सची (Bollywood Stars) मुलं काय शिकतात? कुठे शिकतात? ती कुठल्या पार्टीला गेली? कुणाला डेट करत आहेत, अशा किती तरी प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जातो. लोकांच्या आकर्षणाचा विषय असलेल्या स्टारकिड्सच्या (Star kids) यादीमध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या मुलींचाही समावेश होतो. या जोडप्याची मोठी मुलगी जान्हवी (Janhvi Kapoor) चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यामुळे सध्या अभिनेत्री असलेल्या जान्हवीच्या प्रत्येक हालचालीवर मीडिया आणि फॅन्सचं लक्ष असतं. नुकतेच जान्हवी कपूरचे काही व्हिडिओ (Janhvi Kapoor Video) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जान्हवी कपूर वीकेंडला (Weekend Party) तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत रात्री उशिरा पार्टी करण्यासाठी बाहेर गेली होती. यादरम्यान, तिचे आणि तिच्या मित्रांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर आणि तिच्या मैत्रिणी अतिशय हॉट स्टाइलमध्ये दिसत आहेत. या स्टार डॉटर्सची (Star Daughters) एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अनन्या पांडे, शनाया कपूर आणि कथित बॉयफ्रेंड (Rumored Boyfriend) ओरहान अवत्रामणी (Orhan Awatramani) यांना सोबत घेऊन जान्हवी कपूर वीकेंड पार्टीसाठी बाहेर पडली होती. जान्हवी कपूरने हिरव्या रंगाचा मिनी स्कर्ट आणि पिवळा स्ट्रॅपी टॉप घातला होता. तिच्या हातात एक बॅग होती, तर केस कर्ल करून मोकळे सोडलेले होते. या लूकमध्ये जान्हवी फारच बोल्ड आणि सुंदर दिसत होती. तिची एक झलक पाहण्यासाठी आणि तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
जान्हवीला या गर्दीतून वाचवण्यात ओरहानदेखील अयशस्वी ठरला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दिसताच तिच्या बॉडीगार्ड्सनी (Bodyguards) तिला सुखरूप बाजूला नेलं. जान्हवी कपूरनं गर्दीतून अतिशय शांतपणे मार्ग काढल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिची ही स्टाइल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जान्हवी कपूर सध्या ओरहानला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. सोशल अ‍ॅक्टिव्हिस्ट असलेला ओरहान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. तो सतत फोटो पोस्ट करत असतो. ओरहानच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली, तर तो अनेक बॉलिवुड स्टारकिड्सचा खूप चांगला मित्र असल्याचं दिसतं. शाहरुख खानची मुलगी सुहाना (Suhana Khan) आणि अजय देवगणची मुलगी न्यासा (Nysa Devgan) यांच्यासोबतही पार्टी करतानाचे अनेक फोटो त्यानं शेअर केलेले आहेत. जान्हवी कपूर ओरहानसोबत पार्टीत दिसण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जान्हवी कपूर आणि ओरहान अनेकदा एकत्र दिसले आहेत. याअगोदर दोघांचा मुंबईत एकत्र डान्स पार्टी (Dance Party) केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता पुन्हा जान्हवी आणि ओरहान एकत्र दिसल्यानं ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
First published:

Tags: Bollywood, Janhvi kapoor

पुढील बातम्या