
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या गर्ल गँगसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट ट्रिपचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या भटकंतीचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री काही उत्कृष्ट लोकेशन्स एन्जॉय करताना दिसत आहे

केशरी रंगाचे कपडे परिधान करून जान्हवी सूर्याकडे टक लाऊन पाहात आहे. हे सुंदर दृश्य अभिनेत्रीच्या चाहत्यांना खूप आवडले आहे.

जान्हवी कपूर नेहमीच तिच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून सुंदर व्हेकेशन्सवर जाण्याचे प्लॅन करत असते.

जान्हवी अनेकदा मुंबईत जिम, योगा किंवा मैत्रिणींसोबत कॅज्युअल आउटिंग करताना दिसते. ती दिवसभर स्वतःला सक्रिय ठेवते.

जान्हवी नुकतीच तिचे वडील बोनी कपूरसोबत फिरताना दिसली. दोघांनीही कॅमेऱ्यासमोर पोज दिली. यादरम्यान जान्हवीच्या वडिलांनी मास्क काढण्यास सुरुवात केली तेव्हा मुलीने त्यांना असे करण्यापासून रोखले आणि पापाराझींना चुकीचा सल्ला देऊ नका असे सांगितले.

जान्हवी नुकताच 'रुही' चित्रपटात दिसली होती, ज्यात राजकुमार राव आणि वरुण शर्मा देखील होते. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.

'धडक'मधून बॉलिवूडमध्ये येणारी जान्हवी कपूर सध्या 'गुड लक जेरी', 'दोस्ताना 2' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्ये काम करत आहे.




