अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच आपल्या लुकने चाहत्यांना घायाळ करत असते. जान्हवीच्या हॉट अँड बोल्ड लुकचे सर्वच चाहते वेडे आहेत. जान्हवी आपल्या नव्या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जान्हवीचा वेस्टर्न लूक खूपच पसंत केला जात आहे.
जान्हवी कपूरने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी व्हाईट कलरच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये तिची तुलना व्हेनिला आईस्क्रीमसोबत केली जात आहे.
जान्हवी नेहमीच आपलं नवनवीन फोटोशूट करत असते. वेस्टर्न असो किंवा ट्रॅडिशनल दोन्ही लुकमध्ये जान्हवी नेहमीच शोभून दिसते. जान्हवीचा प्रत्येक लूक चाहत्यांना पसंत पडत्तो.
जान्हवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करून त्यांना आपल्या अपडेट देत असते.
'धडक' या चित्रपटातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. यामध्ये शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर तिचा सहकलाकार होता. हा चित्रपट मराठीतील प्रसिद्ध चित्रपट 'सैराट'चा रिमेक आहे.
जान्हवी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. तर अर्जुन कपूरची सावत्र बहीण आहे. या बहीण-भावांमध्ये सध्या खूपच चांगलं बॉन्डिंग झालं आहे.