मुंबई, 22 जानेवारी- बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत जे आपल्या एखाद्या बोल्ड किंवा हटके सीनसाठी आजही ओळखले जातात. 1985 मध्ये आलेला ‘राम तेरी गंगा मैली’ हासुद्धा असाच एक चित्रपट.या चित्रपटाने त्या काळात खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट हिट झाला, पण त्यातील एका गाण्यात मंदाकिनीच्या धबधब्यावर पांढऱ्या साडीत आंघोळ करणाऱ्या बोल्ड सीनने मोठा धमाका केला होता. हा सीन आजही प्रेक्षकांना चांगलाच लक्षात आहे. अशातच आता अभिनेत्री जान्हवी कपूर ने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तुम्हाला अभिनेत्री मंदाकिनीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. बॉलिवूड अभिनेत्री आणि ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर जान्हवी प्रचंड सक्रिय असते. जान्हवी सतत सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत सर्वांनाच घायाळ करत असते. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. सोशल मीडियावर जान्हवी प्रचंड चर्चेत असते. अभिनेत्रीने फोटो शेअर करताच व्हायरल व्हायला सुरुवात होते.आज जान्हवी पुन्हा एकदा आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (हे वाचा: Vicky Kaushal: स्वप्नपूर्ती! विकी कौशलची 6 वर्षांपूर्वीची ‘ती’ इच्छा पूर्ण;कतरिना नव्हे तर यासाठी केली होती प्रार्थना ) जान्हवी कपूरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सध्या तुफान चर्चा होत आहे. या फोटोंना अभिनेत्रीने कोणतही कॅप्शन दिलेलं नाहीय, तरीसुद्धा हे फोटो अधिक बोलके आहेत. जान्हवीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. इतकंच नव्हे तर जान्हवी साडी नेसून पाण्यात उतरताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लुक सर्वांनाच आकर्षित करुन घेत आहे. सोनेरी काठ असलेली ही साडी नेसून जान्हवी साऊथ इंडियन लुकमध्ये असल्याचं वाटत आहे.
तर अनेकांना जान्हवी कपूरचे हे फोटो सदाबहार अभिनेत्री मंदाकिनीची आठवण करुन देत आहेत. पांढऱ्या साडीत धबधब्या खाली तो बोल्ड सीन दिलेली मंदाकिनी अनेकांच्या डोळ्यासमोर उभी राहिली आहे.
अनेकांनी कमेंट करत जान्हवीला मंदाकिनीची आठवण करुन दिल्याचं म्हणत आहेत. मंदाकिनी यांचा तो सीन आजही चर्चेत असतो.
राज कपूर यांच्या ‘राम ‘तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे मंदाकिनी प्रचंड चर्चेत आल्या होत्या. या चित्रपटातील ‘तुझे बुलायें मेरी बाहें’ या गाण्यात मंदाकिनी यांनी पांढरी साडी नेस्ट धबधब्या खाली अंघोळीचा सीन दिला होता. त्याकाळात या बोल्ड सीनने खळबळ माजवली होती. काही अंशी वादसुद्धा निर्माण केला होता. परंतु हा सीन आजही सर्वांना लक्षात आहे.