Home /News /entertainment /

जय भानुशाली-माही विजच्या अडीच वर्षाच्या लेकीला मिळाली मालिकेची ऑफर, पण...

जय भानुशाली-माही विजच्या अडीच वर्षाच्या लेकीला मिळाली मालिकेची ऑफर, पण...

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता- होस्ट (Tv Actor-Host) जय भानुशाली (Jay Bhanushali) आणि अभिनेत्री माही विज (Mahi Vij) यांची मुलगी तारा (Tara Bhanushali) फारच गोंडस आहे. सोशल मीडियावर ताराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तारा अवघ्या अडीच वर्षांची आहे. इतक्या लहान वयात ताराची फॅन फॉलोइंग एखाद्या सेलिब्रिटीसारखी आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 22 मे-   छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता- होस्ट   (Tv Actor-Host)  जय भानुशाली  (Jay Bhanushali)  आणि अभिनेत्री माही विज (Mahi Vij) यांची मुलगी तारा  (Tara Bhanushali)  फारच गोंडस आहे. सोशल मीडियावर ताराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तारा अवघ्या अडीच वर्षांची आहे. इतक्या लहान वयात ताराची फॅन फॉलोइंग एखाद्या सेलिब्रिटीसारखी आहे. तारासोबत फोटो क्लिक करण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. तर अनेक सेलेब्रिटीसुद्धा ताराचे फोटो आणि व्हिडिओ लाइक आणि शेअर करत असतात. जय आणि माहीने मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांतच ताराच्या नावाचं एक Instagram अकाऊंट तयार केलं होतं. ज्यामध्ये ते दररोज ताराचे क्युट फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. नुकतंच ETimes ला दिलेल्या एका मुलाखतीत, माहीने ताराविषयी काही मनोरंजक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच तिच्या मुलीला आत्तापासूनच मालिकांच्या ऑफर मिळत असल्याचं उघड केलं आहे. तारा लहान वयातच बेबी इन्फ्लुएंसर बनली आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहात असतात. पण माहीला आत्तापासूनच तारासाठी ऑफर्स मिळणे पसंत नाहीय.पाहूया अभिनेत्रीने नेमकं काय म्हटलंय. मुलखतीदरम्यान माहीने सांगितले की, ''मी या गोष्टीबाबत आनंदी नाही तर विरोधात आहे. अभिनेत्रीने म्हटलं, “ताराला अलीकडेच एका मालिकेत बालकलाकारची भूमिका ऑफर करण्यात आली आहे.आणि मी याच्या विरोधात आहे. कारण मला तिचं बालपण सेटवर घालवायचं नाहीय.तिचं बालपण गोड आणि निरागस असायला हवं आहे. ब्रँड स्पोर्ट आणि सर्व ठीक आहे. पण त्यापेक्षा जास्त नाही. ती रोज बॅग घेऊन आत्ताच कामाला जाऊ लागेल असं मला नकोय'.
  माही पुढे म्हणाली की, ''ती एक कडक आई आहे. आणि इतर आयांसारखीच तीदेखील तारासाठी फारच प्रोटेक्टिव्ह आहे. ती म्हणाला, “ती आमची मुलगी आहे म्हणून ती प्रसिद्धी झोतात येणारच. पण आम्ही तिला नेहमी लपवू शकत नाही. मी कधीकधी कठोर आई बनते. तिने आपल्याला हलक्यात घ्यावं असं मला वाटत नाही आणि मला वाटतं की तिने आम्हाला थोडं घाबरलं पाहिजे, नाहीतर भविष्यात ती अशा गोष्टी करू शकते जिथे ती आम्हाला अजिबात घाबरणार नाही. त्यामुळे मी तिच्याशी जिथं हवं त्याठिकाणी कठोर बनते'.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Tv actors

  पुढील बातम्या