मुंबई, 1 जुलै : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलमान खानच्या फार्म हाऊसवर राहत होती. दरम्यानच्या काळात तिनं सलमान सोबत एक अल्बम साँग सुद्धा शूट केलं होतं. ज्याची सोशल मीडियावर खूप गाजलं होतं. सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडीस स्टारर 'तेरे बिना' या गाण्याचं सर्व शूटिंग सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर शूट झालं होतं. पण तिनं आता सलमानचं फार्म हाऊस सोडल्याची माहिती मिळत आहे.
पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार जॅकलीन सध्या सलमानचं फार्म हाऊस सोडून मुंबईतील तिच्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेली आहे. तिची ही मैत्रीण लॉकडाऊनच्या काळात एकटी राहत आहे. दरम्यानच्या काळत ती काही प्रमाणात तणावग्रस्त आहे. लॉकडाऊन दरम्यान ती तिच्या या मैत्रिणीच्या संपर्कात होती. जसं जॅकलीनला समजलं की, तिची मैत्रीण तणावग्रस्त आहे. तेव्हा तिनं सलमानचं फार्म हाऊस सोडून मैत्रिणीचं घर गाठलं.
महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊन 31 जुलै पर्यंत वाढवलं आहे. अशात आपल्या मैत्रिणीचं एकटेपण दूर करण्यासाठी आणि तिला मदत करण्यासाठी जॅकलीननं सलमानचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती शेवटची सलमानच्या तेरे बिना या गाण्यात दिसली होती. दरम्यान लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात जॅकलीन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांना सकारात्मक मेसेज देण्याचा प्रयत्न करते.