• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'माझं नाव घेऊ नको' अनन्या पांडेसाठी पुष्पगुच्छ घेऊन जाणारा ईशान खट्टर झाला ट्रोल; VIDEO होतोय VIRAL

'माझं नाव घेऊ नको' अनन्या पांडेसाठी पुष्पगुच्छ घेऊन जाणारा ईशान खट्टर झाला ट्रोल; VIDEO होतोय VIRAL

अभिनेत्री अनन्या पांडे गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर असून तिची सतत चौकशी सुरू आहे. तीन दिवस सतत चौकशी केल्यानंतर अनन्याचा खास मित्र ईशान खट्टर तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता.

 • Share this:
  मुंबई, 24ऑक्टोबर- चंकी पांडेची मुलगी आणि बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) या दिवसात बरीच चर्चेत आहे. आजकाल ती आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीमुळे चर्चेत आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत चौकशी केल्यानंतर, एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याचा मित्र बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर(Ishan Khattar) स्वतः अनन्याच्या घरी फुलांचा गुच्छ घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून ट्रोलर्स इशानला ट्रोल करत आहेत.
  अभिनेत्री अनन्या पांडे गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर असून तिची सतत चौकशी सुरू आहे. तीन दिवस सतत चौकशी केल्यानंतर अनन्याचा खास मित्र ईशान खट्टर तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. विरल भयानीने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इशान खट्टर फुलांच्या दुकानात स्वतः समोर उभं राहून पुष्पगुच्छ बनवून घेताना दिसत दिसत आहे. हा पुष्पगुच्छ खरेदी केल्यानंतर ईशान त्याच्या कारमध्ये बसतो. आणि त्यानंतर ईशानची कार अनन्याच्या इमारतीकडे जाताना दिसते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी याला खरे प्रेम म्हटलं आहे. त्याचबरोबर काहीजण असे आहेत जे व्हिडिओ पाहून इशानची खिल्ली उडवताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे - 'हेच सांगायला गेला असेल,प्लीज माझं नाव घेऊ नको '. दुसऱ्या यूजरनं लिहिलं आहे - 'फुले देऊन तुम्ही हेच सांगितलं असेल, कृपया माझं नाव एनसीबीला सांगू नको.'आणखी एका यूजरने लिहिलं - 'याचं तर करिअरही नाही, जे एनसीबी संपवेल म्हणायला'. (हे वाचा:'ही तुमची शूटिंग किंवा प्रोडक्शन हाऊस नाही' चौकशीसाठी उशिरा आलेल्या ... ) ईशान खट्टर आणि अनन्या पांडे 'खाली पीली' चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी केली नव्हती. पण चाहत्यांना या दोघांची केमिस्ट्री आवडली होती.त्याचवेळी, या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही खूप वेगाने बाहेर आल्या होत्या. मात्र, दोघेही एकमेकांना आपले चांगले मित्र म्हणत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. (हे वाचा:NCB च्या रडारवर असलेली Ananya panday याआधीही होती वादात; अशी ... ) अनन्याचं आर्यन खान कनेक्शन - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबी (NCB) ज्या व्हाट्सअॅप चॅट्सचा हवाला देऊन अनन्या पांडे (Ananya Panday) हिची चौकशी करीत आहेत, ते आर्यन खान (Aryan Khan) आणि अनन्या पांडे यांच्यामधील आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये (WhatsApp Chat) आर्यन खान आणि अनन्या पांडे गांजाबद्दल बोलत होते.
  Published by:Aiman Desai
  First published: