जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / नवऱ्याने पॉइंट झिरोवरुन झाडली गोळी; अभिनेत्रीच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट

नवऱ्याने पॉइंट झिरोवरुन झाडली गोळी; अभिनेत्रीच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट

ईशा आलिया

ईशा आलिया

झारखंडमधील अभिनेत्री रिया कुमारी उर्फ ईशा आलियाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या बातमीनं सर्वत्र खळबळ उडालेली पहायला मिळाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 डिसेंबर : झारखंडमधील अभिनेत्री रिया कुमारी उर्फ ईशा आलिया ची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या बातमीनं सर्वत्र खळबळ उडालेली पहायला मिळाली. झारखंडमधील अभिनेत्री ईशा आलिया हिची बुधवारी पहाटे पश्चिम बंगालमधील हावडा येथे महामार्गावरील दरोडेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची बातमी समोर आली होती. आता ईशा आलिया प्रकरणी आणखी मोठीअपडेट समोर आली आहे. ईशा आलियाची हत्या तिचा पती प्रकाश कुमारनेच केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जेव्हा अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तिचा पती आणि दिग्दर्शक प्रकाश अलबेला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली तेव्हा हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी प्रकाशला अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गोळी ईशाच्या कानाला लागली आहे. ईशाला पॉईंट झिरोमधून शूट करण्यात आलं आहे. हेही वाचा -  Nitin Manmohan : बॉलिवूडवर शोककळा; लाडला चित्रपटाचे निर्माते नितीन मनमोहन यांचं निधन या घटनेविषयी ईशाच्या नवऱ्यानं पोलिसांनी काही वेगळंच सांगितलं होतं. या घटनेविषयी ईशा आलियाच्या पतीनं सांगितलं, ‘माझी मुलगी नुकतीच झोपेतून जागा झाली होती. माझ्या पत्नीने मला कार पार्क करण्यास सांगितले जेणेकरून ती तिला खाऊ घालू शकेल. मी गाडी पार्क केली आणि निसर्ग पाहण्यासाठी बाहेर पडलो. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि आमच्या मागे उभी राहिली. तीन जण खाली उतरले आणि एकाने माझ्यावर हल्ला केला. त्याने माझे पॉकेट घेतले आणि मला ढकलले. अचानक मला माझ्या बायकोचा ओरडण्याचा आवाज आला. मी आवाज देण्यापूर्वीच गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि ते लोक पळून गेले’.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, ईशा आलिया अवघ्या 22 वर्षांची होती. ईशाच्या कुटुंबीयांनी प्रकाशविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबीयांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याआधीही तो रियाला मारहाण करत असे, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: actress , death
  • First Published :
जाहिरात
जाहिरात