मुंबई, 16 डिसेंबर : परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान याची मुलगी इरा खान हिने आपल्या पहिल्या वहिल्या मॉडेलिंग असाइनमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बॅकलेस हाय स्लिट नेव्ही ब्लू ड्रेसमध्ये इरा अगदी हॉट दिसते. अजून बॉलिवूडमध्ये पादर्पणही न केलेल्या इराचे सोशल मीडियावर फॅन्स आहेत. तिचे फॅन्स हे फोटो पाहून तिच्यावर आणखी फिदा झाले आहेत. इराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इरा खानने Euripiedes’ Medea नावाचं एक नाटक दिग्दर्शित केलं होतं. वेगळ्या धाटणीच्या या नाटकाचं रंगभूमीवर कौतुक झालं होतं. आता तिने एका फोटोग्राफरसाठी नितांत सुंदर ठिकाणी हे फोटोशूट केलं आहे. ती या पिक्चर परफेक्ट लोकेशनवर कलाकाराची प्रेरणा अर्थात मूज झाली आहे.
तिच्या या फोटोंवर शेकड्याने कमेंट्स आल्या आहेत. आणखी एक परफेक्शनिस्ट येणार. एक हुशार स्टार किड येत आहे, असं लोकांनी यावर म्हटलं आहे. स्वतः इराने या प्रत्येक फोटोला एक कॅप्शनही दिलेलं आहे. इरा खान ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता हिच्यापासून झालेली मुलगी आहे.