जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / IPL 2023: LIVE सामन्यात ऋषभ पंतच्या चाहतीने केलं असं कृत्य, भडकली उर्वशी रौतेला

IPL 2023: LIVE सामन्यात ऋषभ पंतच्या चाहतीने केलं असं कृत्य, भडकली उर्वशी रौतेला

IPL मध्ये ऋषभ पंतच्या चाहतीचं ते कृत्य उर्वशीला खटकलं

IPL मध्ये ऋषभ पंतच्या चाहतीचं ते कृत्य उर्वशीला खटकलं

IPL 2023 Rishabh Pant Fans: दरवर्षीप्रमाणे यंदाही IPLची धमाकेदार सुरुवात झाली आहे. चाहते कित्येक दिवसांपासून या पर्वाची प्रतीक्षा करत होते. काल दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्समध्ये चुरशीचा सामना पार पडला.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 एप्रिल- दरवर्षीप्रमाणे यंदाही IPLची धमाकेदार सुरुवात झाली आहे. चाहते कित्येक दिवसांपासून या पर्वाची प्रतीक्षा करत होते. काल दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्समध्ये चुरशीचा सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी चक्क ऋषभ पंत ने स्टेडियमवर हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी ऋषभचा गंभीर अपघात झाला होता. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु होते. सध्या तो बऱ्यापैकी यातून रिकव्हर होत आहे. ऋषभने स्टेडियमवर हजेरी लावत आपल्या टीमचा उत्साह तर वाढवलाच शिवाय चाहत्यांनाही मोठं सरप्राईज दिलं आहे. या सामन्यामध्ये आणखी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तरुण क्रिकेटर ऋषभ पंतने आपल्या जबरदस्त खेळीने नेहमीच चाहत्यांचं मन जिंकलं आहे. ऋषभच्या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला होता. सर्वजण क्रिकेटरच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. आता ऋषभ बऱ्यापैकी या सर्वातून बाहेर पडत आहे. ऋषभ पंतचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते सतत सोशल मीडियावर ऋषभला पाठिंबा देताना आणि प्रेम व्यक्त करताना दिसून येतात. (हे वाचा: Bipasha Basu: किती गोड! बिपाशा बसूने अखेर दाखवला लेकीचा चेहरा; अशी दिसते देवी ) दरम्यान ऋषभ पंतच्या एका चाहतीने लाईव्ह मॅचदरम्यान असं काही केलं की, त्यामुळे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला नाराज झाली आहे. उर्वशी रौतेला बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री सतत सोशल मीडियावरुन आपलं मत व्यक्त करताना दिसून येते. आता अभिनेत्रीने ऋषभ पंतच्या चाहतीचा तो फोटो शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

News18

अपघातानंतर काल ऋषभ पंत पहिल्यांदाच स्टेडियममध्ये दिसून आला. परंतु क्रिकेटर अद्याप खेळण्याच्या स्थितीत नाहीय. त्यामुळे तो क्रिकेट पाहण्यासाठी आणि आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचला होता. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बसून ऋषभ सामन्याचा आनंद घेताना दिसून आला. ऋषभला स्टेडियममध्ये पाहून चाहतेही खुश झाले होते. दरम्यान ऋषभच्या एका चाहतीने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

ऋषभ पंतच्या एका चाहतीने हातात एक हटके पोस्टर पकडला होता. या पोस्टरवर लिहण्यात आलं होतं,आभारी आहे देवा.. उर्वशी याठिकाणी नाही’. या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अभिनेत्रीची फिरकी घ्यायला सुरुवात केली आहे. अशातच आता उर्वशी रौतेलाने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत का? असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात