मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एका ट्रेनरमुळे 13 आदिवासी मुलांचं बदललं आयुष्य, वाचा प्रिन्स डान्स ग्रुपची प्रेरणादायी कहाणी

एका ट्रेनरमुळे 13 आदिवासी मुलांचं बदललं आयुष्य, वाचा प्रिन्स डान्स ग्रुपची प्रेरणादायी कहाणी

मलकानगिरी जिल्ह्यातील डोंगरात राहणाऱ्या 'बोंडा' जमातीच्या प्रिन्स डान्स ग्रुपच्या तरुणांनी अत्यंत गरिबी आणि ग्रामीण वातावरणात राहूनही आपल्या स्किलमुळे आपण जगात आपला ठसा उमटवू शकतो हे दाखवून दिलं आहे.

मलकानगिरी जिल्ह्यातील डोंगरात राहणाऱ्या 'बोंडा' जमातीच्या प्रिन्स डान्स ग्रुपच्या तरुणांनी अत्यंत गरिबी आणि ग्रामीण वातावरणात राहूनही आपल्या स्किलमुळे आपण जगात आपला ठसा उमटवू शकतो हे दाखवून दिलं आहे.

मलकानगिरी जिल्ह्यातील डोंगरात राहणाऱ्या 'बोंडा' जमातीच्या प्रिन्स डान्स ग्रुपच्या तरुणांनी अत्यंत गरिबी आणि ग्रामीण वातावरणात राहूनही आपल्या स्किलमुळे आपण जगात आपला ठसा उमटवू शकतो हे दाखवून दिलं आहे.

मुंबई, 14 फेब्रुवारी : ओडिशामधील दुर्गम मलकानगिरी जिल्ह्यातील (Malkangiri District) 13 आदिवासी मुलांच्या ग्रुपने आपल्या डान्सने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की जर एखाद्या व्यक्तीमध्ये कठोर परिश्रम करण्याची हिंमत आणि समर्पण असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय साध्य करू शकतो. आम्ही बोलतोय ओडिशाच्या 'प्रिन्स डान्स ग्रुप'बद्दल (Prince Dance Group). या ग्रुपमधील प्रत्येकाचं वय 10 ते 18 वर्षे आहे. या ग्रुपने टीव्हीच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये (India’s Got Talent) मार्शल आर्ट्स (marshal art) आणि फ्युजन ऑफ मार्शल आर्ट्स (Fusion of Martial Arts & Dance) आणि डान्समध्ये अप्रतिम डान्स सादर करून लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या या कामगिरीचे सर्वजण कौतुक करत आहेत.

मलकानगिरी जिल्ह्यातील डोंगरात राहणाऱ्या 'बोंडा' जमातीच्या प्रिन्स डान्स ग्रुपच्या तरुणांनी अत्यंत गरिबी आणि ग्रामीण वातावरणात राहूनही आपल्या स्किलमुळे आपण जगात आपला ठसा उमटवू शकतो हे दाखवून दिलं आहे. 'स्वाभिमान आंचल'च्या (Swabhimaan Anchal) अनाथ (orphan) मुलांचा हा गट शोच्या दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरला आहे.

ट्रेनरची गुणग्राहकता

या मुलांमध्ये दडलेले टॅलेंट सर्वप्रथम त्यांचे ट्रेनर (Trainer) बिनाश मिश्रा यांनी ओळखले. बिनाशच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी या मुलांचं टॅलेंट आणि क्षमता पाहिली तेव्हा त्यांनी त्या सर्वांना ट्रेनिंग सेंटरमध्ये आणलं. एवढंच नव्हे तर त्यांची राहण्याची व्यवस्थाही केली. कालांतराने, प्रत्येकाचा डान्स (dance) सुधारला. ऑल ओडिशा मार्शल आर्ट्स असोसिएशननेही या मुलांना पाठिंबा दिला आणि हळूहळू या ग्रुपला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळू लागली.

दानशूर लोकांकडून आर्थिक मदत

ही मुलं कलागुणांनी संपन्न होती, पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना मोठा प्लॅटफॉर्म मिळू शकला नाही. यावेळी काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने या लोकांना रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई गाठण्यात यश आलं. 'प्रिन्स डान्स ग्रुप'चे राम मडकामी म्हणतात, 'आम्ही एवढ्या पुढे जाऊ असं कधीच वाटलं नव्हतं. मुंबईत आल्याने आमच्या उत्साहात भर पडली आहे. आता आम्ही केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आमची प्रतिभा दाखवण्यासाठी उत्सुक आहोत.’

ग्रुपमधील मुलांचा आनंद

दरम्यान, 'प्रिन्स डान्स ग्रुप'चे सर्व सदस्य त्यांच्या यशाबद्दल खूप आनंदी आहेत. या ग्रुपमध्ये असलेला नकुल किरसानी सांगतो की, सध्या आम्ही पुढील फेरीसाठी मनापासून सराव करत आहोत. तर दुसरीकडे अर्जुन खराला हे सर्व स्वप्नासारखं वाटत आहे. अर्जुन म्हणतो,'मी इथपर्यंत पोहोचेन, असं मला कधीच वाटलं नव्हतं. हे सर्व फक्त आमचे ट्रेनर बिनाश सरांमुळे शक्य झालं. पुढच्या फेरीत आम्ही अजून चांगली कामगिरी करू,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला.

तुमच्यात प्रतिभा असेल तर तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही, हे प्रिन्स डान्स ग्रुपने हे सिद्ध करून दाखवलं आहे.

First published:

Tags: Dance video, Reality show