आपल्या आजूबाजूला अनेक अजब गोष्टी घडत असतात. त्या गोष्टी पाहून सर्वानांच आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. असंच काहीसं घडलं आहे गुजरातच्या वडोदरामध्ये.
क्षमा बिंदू या डिजिटल क्रियेटर महिलेने स्वतःसोबतच लग्नगाठ बांधली आहे. हे पाहून जो-तो आश्चर्य व्यक्त करत आहे.
क्षमाने काही दिवसांपूर्वी आपण स्वतः सोबतच लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र भाजप नेत्याने यासाठी विरोध दर्शविला होता.
या लग्नात क्षमाच्या जवळच्या मैत्रिणी उपस्थित होत्या. त्यांनतर आता ती एकटीच गोव्याला आपल्या हनिमूनसाठी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.