Home /News /entertainment /

India's Best Dancer Season 2 : आतापर्यंत कधीच पाहिला नसेल असा डान्स; जजेसही झाले थक्क, video viral

India's Best Dancer Season 2 : आतापर्यंत कधीच पाहिला नसेल असा डान्स; जजेसही झाले थक्क, video viral

सोनी टीव्हीच्या डान्स रिअॅलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर 2' (India’s Best Dancer 2) मधील सर्वोत्कृष्ट स्पर्धक स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. ओडिशाची स्पर्धक रोझा राणा (Roza Rana) आणि तिचा डॅशिंग कोरिओग्राफर सनम जोहर (Sanam) आणि निरजा यांनी मिळून 'बंब' भोले या महादेवाच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 डिसेंबर-सोनी टीव्हीच्या डान्स रिअॅलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर 2' (India’s Best Dancer 2) मधील सर्वोत्कृष्ट स्पर्धक स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. ओडिशाची स्पर्धक रोझा राणा (Roza Rana) आणि तिचा डॅशिंग कोरिओग्राफर सनम जोहर (Sanam) आणि निरजा यांनी मिळून 'बंब' भोले या महादेवाच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. सध्या या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या तिघांचा डान्स पाहून शोच्या तिन्ही परीक्षकांनी म्हणजे मलायका अरोरा(Malaika Arora), गीता कपूर(Geeta Kapoor) आणि टेरेंस(Terence Lewis) यांनी त्यांचे कौतुक केले. अंगावारा शहारा आणणारा हा डान्स होता. सध्या हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंतचे यांचे सर्वच डान्स अॅक्ट जबरदस्त होते पण या डान्सने चाहत्यांचे मन जिंकले आहे. सनम, रोझा आणि निरजा यांच्या व्हायरल डान्स व्हिडिओवर कमेंटचा महापूर आला आहे. या अॅक्टमधील प्रेत्येक स्टेपही आश्चर्य करणारी होती. प्रत्येक क्षणाला काही तरी नवीन पाहायला मिळत होते. तिघांचा लुकही तितकाच दमदार होता. आतापर्यंत असा डान्स कोणत्याच रिअॅलिटी शोमध्ये झाला नाही असाच काहीसा हा डान्स आहे. सनमने महादेवाचे रूप धारण केले आहे तर रोझा आणि निरजा दोघी त्याच्या शिष्य बनल्या आहेत. तिंघाचीही प्रत्येक स्टेप मनाला भिडणारी आहे. त्यांचा तांडव डान्स एकाद्या सिनेमात असतो त्याप्रमाणे होता. प्रेक्षकांकडूनही या डान्स कौतुक होत आहे. वाचा-R Madhavan पत्नी, मुलासह दुबईत होणार शिफ्ट, काय आहे कारण? सोनी टीव्हीच्या डान्स रिअॅलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर 2' (India’s Best Dancer 2) हा सीजन पहिल्या सीजन एतकाच दमदार आहे. यावेळचे स्पर्धक देखील तोडीस तोड आहे. त्यांना चांगल्या कोरिओग्राफरसची साथ मिळाली आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Sony tv, TV serials

    पुढील बातम्या