मुंबई, 18 डिसेंबर: दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार धनुष (Dhanush) आता आणखी एका वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. यावेळी तो थेट हॉलिवूड सिनेमात त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवणार आहे. मीडिया अहवालांच्या मते हा सिनेमा एक स्पाय सिनेमा असणार आहे. यामध्ये धनुष क्रिस एव्हान्स (Chris Evan), रेयान गॉसलिंग (Ryan Gosling) आणि Ana de Armas यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. नेटफ्लिक्सने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सच्या या घोषणेनंतर त्याचे चाहते आणि भारतीय मनोरंजन विश्वातील त्याचे सहकलाकार ‘Can’t Keep Calm’ या फेजमध्ये आहेत. त्याचे सर्व चाहते धनुषच्या नव्या भूमिकेसाठी उत्सूक आहेत. अभिनेता प्रसन्ना याने देखील ट्वीट करत धनुष तुझा अभिमान वाटतो आहे, असं म्हटलं आहे.
धनुषने The Extraordinary Journey of the Fakir या सिनेमातून आंतरराष्ट्रीय सिनेमात पदार्पण केलं होतं. 2019 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. धनुषचा नवा सिनेमा ‘द ग्रे मॅन’ मार्क ग्रिनी (Mark Greaney) यांच्या कादंबरीवर आधारित आहे. मीडिया अहवालांच्या मते हा सिनेमा अत्यंत महागड्या बजेटचा असणार आहे. या सिनेमासाठी 200 मिलियन डॉलर अर्थात साधारण 1500 कोटींचं बजेट आहे.
या सिनेमाची पटकथा जो रुसो (Joe Russo) यांनी Avengers: Endgame चे पटकथा लेखक ख्रिस्तोफर मार्कस आणि स्टिफन मॅकफिली यांच्यासह लिहिली आहे.