मुंबई, 17 जानेवारी- सोनी मराठीवरील लोकप्रिय मराठी रियॅलिटी शो (Indian Idol Marathi) ‘इंडिया आयडॉल मराठी’ या शोचे सूत्रसंचालन मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री (swanandi tikekar) स्वानंदी टिकेकर दिसते आहे. आता यात काहीसा बदल होणार आहे. सर्वांची आवडती होस्ट स्वानंदी टिकेकर या शोमध्ये दिसणार नाही. काही दिलस या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्त माळी करताना दिसणार आहे. हा बदल का करण्यात आला आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एक पोर्टलनं याबद्दल वृत्त दिलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, स्वानंदी टिकेकरच्या जागी या आठवड्यात प्राजक्त माळी ) ‘इंडिया आयडॉल मराठी’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्यामुळे प्राजक्त माळीचे चाहते देखील तिला हा शो होस्ट करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. प्राजक्ताला यापूर्वी सूत्रसंचालन करताना सर्वांनी पाहलि आहे. त्यामुळे या शोमध्ये देखील तिच्या सूत्रसंचलनाची जादू चालणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
प्राजक्ताला कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चे सूत्रसंचालन करताना सर्वांनी पाहिले आहे. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत.ती सातत्यानं काही वेगळं करत असते. भूमिका असोत, सूत्रसंचालन असो वा चाहत्यांशी संवाद. प्राजक्ताचा ‘प्राजक्तप्रभा’ असं काव्यसंग्रह देखील आहे. वाचा- Lata Mangeshkar यांच्या प्रकृतीसाठी घरात शिव रुद्र स्थापित: आशा भोसले स्वानंदी टिकेकरला आपण एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतो. मात्र स्वानंदी एक उत्तम गायिका देखील आहे. तिला गाण्याचा वारसा हा तिच्या आईकडून म्हणजेच आरती अंकलीकर टिकेकर यांच्याकडून मिळाला आहे. तर अभिनयाचा वारसा वडिलांकडून मिळाला आहे. तिचे वडील म्हणजे अभिनेते उदय टिकेकर.उदय यांना आपण त्यांच्या अनेक भूमिकांसाठी ओळखतो. प्रामुख्याने त्यांनी केलेल्या भूमिका या खलनायिकी प्रवृत्तीकडे झुकणाऱ्या असल्या तरीही, त्यांच्या सकारात्मक भूमिकाही गाजल्या आहेत. स्वानंदि ही सुद्धा गायनाकडे वळण्याअगोदर आपल्याला अभिनेत्री म्हणून परिचित झाली ती, दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. स्वानंदीने सिंगिंग स्टार या शोमधून गायिकेला सुरूवात केली त्यानंतर तिला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली.