मुंबई, 7डिसेंबर - टीव्हीवरील रिएलिटी शो 'इंडियन आयडॉल १२' (Indian Idol 12) अत्यंत लोकप्रिय झाला होता. या सीजनमध्ये एक रोमँटिक केमिस्ट्री सर्वांना दाखवण्यात आली होती. ती म्हणजे स्पर्धक पवनदीप राजन (Pavandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) यांची. या जोडीने सर्वांनाच भुरळ घातली होती. ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच सोशल मीडियावर या दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये या दोघांनी चक्क लग्न केल्याचं दिसत आहे. कारण दोघेही अगदी नवरा-नवरीच्या वेशात दिसून येत आहेत.
काही महिन्यांपूर्वी सोनी वाहिनीवर 'इंडियन आयडॉल' हा सिंगिंग शो आपल्या भेटीला येत होता. नुकताच या शोचा हा १२ वा सीजन पार पडला आहे. यावेळी सर्वच स्पर्धक आणि परीक्षकांनी धम्माल केली होती. हा सीजन सर्व सीजनपेक्षा दीर्घकाळ चालला होता. या शोमधील स्पर्धकांनी आपल्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं होत. तसेच शोमध्ये स्पर्धक असणाऱ्या अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांच्यामध्ये लव्ह केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. अनेकांना ही जोडी मोठ्या प्रमाणात पसंत पडली होती. शोमध्ये दाखवण्यात येत असलेल्या या लव्ह केमेस्ट्रीवरून अनेकदा वादही झाले होते. शोच्या टीआरपी साठी प्रेक्षकांच्या भावनांशी खेळलं जात असल्याचे आरोप लावण्यात येत होते. हे काहीही असलं तरी या दोघांच्या चाहत्यांना त्यांची जोडी फारच पसंत होती.
View this post on Instagram
नुकताच पवनदीप आणि अरुणिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फारच रोमँटिक आहे. यामध्ये वरून बर्फ पडत आहे. या फिल्मीसारख्या परिस्थितीत हे दोघेही रोमँटिक हिंदी गाणं म्हणत आहेत. पवनदीप आणि अरुणिता थंडीत कुडकुडत 'मेरे सांसो मी छिपा है तेरा ही नाम' हे बॉलिवूड सॉन्ग म्हणत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताच त्यांचे चाहते यावर भरभरून कमेंट्स देत आहेत. तसेच लाईकसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सध्या पवनदीप, अरुणिता, सायली, दानिश सध्या युकेच्या दौऱ्यावर आहेत. हे स्पर्धक चक्क युकेमध्ये आपले लाईव्ह शो करत आहेत. त्यामुळे यांना चांगलंच स्टारडम मिळालं आहे. ते सतत चर्चेत आहेत. बऱ्यापैकी त्यांची लाइफस्टाइलसुद्धा बदलली आहे. ते सतत सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून आपल्या चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असतात. तसेच हे स्पर्धक पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजेच २०२२ पर्यंत विदेशातच राहणार आहेत. तसेच काही दिवसानंतर शन्मुखप्रिया आणि निहालसुद्धा त्यांना जॉईन करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Indian idol