इंडियन आयडॉल 12' हा सीजन प्रचंड लोकप्रिय झाला होता. या शोची तुफान चर्चा झाली होती. सोबतच या शोच्या स्पर्धकांनासुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.
यामध्ये स्पर्धक असणारे पवनदीप राजन, सायली कांबळे,मोहम्मद दानिश, अरुणिता कांजीलाल, आशिष कुलकर्णी, सवाई भट्ट, अंजली गायकवाड यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता.
काही महिन्यांपूर्वी या शो ने आपला निरोप घेतला होता. परंतु चाहते या स्पर्धकांना फारच मिस करत होते. आणि त्यांना पुन्हा पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त करत होते.
दरम्यान आता यातील काही स्पर्धकांनी पुन्हा एकदा छोट्या पदड्यावर एन्ट्री केली आहे. परंतु यावेळी ते स्पर्धक नव्हे तर मेंटॉर्स म्हणून पाहायला मिळणार आहेत.
लवकरच सोनी वाहिनीवर 'इंडियाज बेस्ट सिंगर' हा रिएलिटी शो आपल्या भेटीला येणार आहे. यामध्ये छोटे उस्ताद आपली कला सादर करताना दिसणार आहेत.
या शोमध्ये आदित्य नारायण होस्टच्या भूमिकेत असणार आहे. तर पवनदीप राजन, सायली कांबळे, मोहम्मद दानिश, अरुणिता कांजीलाल आणि सलमान अली मेंटॉर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या शोची शूटिंग नुकतंच सुरू झाली आहे. त्यामुळे या सर्वांनी सोशल मीडियावर 'घर वापसी' असं म्हणत आनंद व्यक्त केला आहे.
तर पवनदीप राजनने आपले सहकार मित्र आणि होस्ट आदित्य नारायणसोबतचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत तुमची आवडती टीम परत आल्याचं म्हटलं आहे.