सेलिब्रेटी नेहमीच सोशल मीडियावरुन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.सेलेब्रेटींना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचणं फारच सोपं झालं आहे.
अनेक सेलिब्रेटी आपल्या बालपणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना संभ्रमात टाकत असतात. आजही असंच काहीसं झालं आहे.
सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचे फोटो व्हायरल होत आहेत. परंतु तुम्हाला माहितेय का ही फोटोतील लहान मुलगी आज एक गायिका आहे.
या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली दुसरी कुणी नसून 'इंडियन आयडॉल'मुळे देशभरातल्या रसिकांपुढे पोहोचलेली मराठमोळी गायिका सायली कांबळे आहे.
सायली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यासंबंधी अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
आजही या तरुण गायिकेने असंच केलं आहे.गायिकेने आपल्या बालपणाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती आपल्या बाबांसोबत दिसून येत आहे.
सायलीच्या या फोटोंवरडान्सर पुनीत पाठकची पत्नी निधी पाठक, मोहम्मद दानिशसह अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत.